कौशल्य विकासात्मक आणि रोजगारभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

42

🔸आरमोरी, कुरखेडा , धानोरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होणार प्रशिक्षण केंद्र

🔹हजारो युकव.. युवतींना मिळणार प्रशिक्षणातुन रोजगाराच्या संधी

✒️चक्रधर मेश्राम(गडचिरोली,विशेष प्रतिनिधी)मो:-9623459632

गडचिरोली(दि.15आक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही भागातील रहिवासी असलेल्या, अर्धवट शिक्षण सुटलेल्या युवक.. युवतींना कौशल्य विकासात्मक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण ” smt R .SHASHIKALA VOCATIONAL AND PARAMEDICAL TRAINING सेंटर ” तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ऑफ व्होकेशनल सेंटर च्या माध्यमातून आरमोरी, कुरखेडा , धानोरा , या ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात डाटा एंट्री आपरेटर , एनटीटी., शिवणकला, लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, एक्स रे टेक्नॉलॉजी , जनरल ड्युटी असिस्टंट , फायर ॲंड सेफ्टी स्किल, न्युट्रीशन ॲन्ड डायटेशियन , वेल्डिंग आणि म्युझिक, संगीत इत्यादी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे..

या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 3 प्रशिक्षकांची अशा एकुण 30 पदांची योग्यता आणि पात्रतेनुसार निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता दि. 24 ऑक्टोबर 2021 रोज रविवारला सकाळी 11 ते 3 या वेळात मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी आर. शशिकला एज्युकेशन ऑफ व्होकेशनल ॲंड पॅरामेडिकल सायन्स. . आंबेडकर नगर कुरखेडा ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे मेश्राम सर 9421726778 तसेच सोनिया वैद्य मॅडम 7083435806 यांचेशी संपर्क साधावा. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह फार्म भरून घ्यावेत.