आदर्श ग्राम विकास बहुद्देशीय संस्था, नंदप्पा तालुका जिवती द्वारा मुसा शेख यांचा सन्मान

36

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16ऑक्टोबर):-दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 ला आदर्श ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था नंदप्पा,चे संस्थाध्यक्ष सन्माननीय श्री पांडुरंग रामुजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधी कला महाविद्यालय,पाटण या महाविद्यालया तर्फे संस्थेचे संस्थाध्यक्ष सन्माननीय पांडुरंग रामुजी जाधव, संचालक सीडीसीसी बँक चंद्रपुर यांच्या वाढदिवसानिमित्त ,भारताचे थोर सुपुत्र,महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

तसेच 15 ऑक्टोबर ला जागतिक हात धुवा दिन सुद्धा साजरा केला जातो.यासोबतच महाराष्ट्रात संपूर्ण शाळांमध्ये *वाचन प्रेरणा दिवस* सुद्धा साजरा केला जातो.अशा या शुभ दिनी सन्माननीय पांडुरंग रामुजी जाधव यांचा वाढदिवस त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे साजरा झाला. covid-19 काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालेलं असताना आरोग्य क्षेत्र,पोलिस क्षेत्र,आणि शिक्षण क्षेत्र मधील विवीध घटकांनी तसेच सामाजिक संस्थांनी समाजासाठी अतिशय मोलाचे कार्य केले.आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी त्यासोबतच अगदी समाजाच्या,गावखेड्यातीलआरोग्याच्या दृष्टीने अगदी जवळच घटक आशा वर्कर यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते.

त्यामुळे त्यांनी तालुक्यातील विविध आशा वर्कर,रूग्ण सेवक यांचा आणि शिक्षण,पोलीस विभागातील निवडक व्यक्तींचा त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना स्मृत्तिचिन्ह ,प्रमाणपत्र, शाल-श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गजानन पाटील जुमनाके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा.महेबूब भाई,शेख,मा.यशोधरा ताई जाधव,मा.अब्दुल जमीर,मा.ममताजी जाधव,मा.भीमराव राव पाटील,मा.कुमरे पाटील,मा जुमनाके पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.सदर सत्कार कार्यक्रमात विरुर स्टे.चे ठाणेदार,श्री राहुल चव्हाण साहेब,शिक्षण क्षेत्रातील, श्री बाबुमिया शेख,श्री राजेंद्र,परतेकी,श्री रामा पवार,श्री मुसा शेख,श्री,बाबा कोडापे व श्री अली रजा अजानी इत्यादी शिक्षक,साधनव्यक्ती व केंद्रप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.

आरोग्य विभागातील आशा वर्कर यांचा सत्कार हा पहिल्यांदाच होत आहे असे मत अनेकांनी व्यक्त केले.विविध सत्कार मुर्तींनी सुंदर प्रतिक्रिया देऊन आभार व्यक्त केले.सर्व मान्यवरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केल.आजच्या या वाढदिवसा प्रसंगी समाजाचा अगदी जवळचा घटक,गाव खेड्यातील आरोग्य विभागातील आशा वर्कर यांनी कोविड 19 कालावधीत अतिशय मोलाची कामगिरी बजावली,अशा आरोग्य क्षेत्रातील आशा स्वयंसेविका यांचा सत्कार झाला ही जिल्ह्यातील एक दुर्मिळ बाब होती आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा.जाधव साहेबांनी ,मानाचे स्थान दिले.अतिशय प्रेरणादायी सत्कार या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला ही निश्चितच अभिमानाची बाब होती.आजचा कार्यक्रम अतिशय छान झाला.सदर संस्थेनी,एक चांगला आदर्श समाजात निर्माण केला.वाढदिवस निमित्त सर्वांनी केक कापून शुभेच्छा दिल्या.