65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी धनज येथे बुद्ध वंदना कार्यक्रम संपन्न

65

✒️अमोल उत्तम जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.16ऑक्टोबर):-नागपूर येथे दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये विजयादशमीच्या दिवशी आपल्या पाच लाख अनुयायां सोबत बौद्ध धम्म र्स्वीकारला आणि बौद्ध धम्माचं चक्र गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केलं. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. उमरखेड तालुक्यातील धनज यथे बुद्ध विहार येथे 65 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना दिली व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व पंचशील वदंना घेण्यात आली.

यावेळी बौद्ध अनुयायी उपस्थित होते. आधुनिक भारताच्या इतिहासात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकुबाचा आणि प्रज्ञेचा कर्ता सुधारक शोधून सापडणार नाही. प्रकांड विद्वान ,प्रज्ञावंत लेखक प्रचंड क्षमतेचा संघटक आणि सुधारक बाबासाहेबांच्या रूपाने भारताने अनुभवला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला बद्दल वाचावे आणि लिहावे तेवढे थोडे.अस्पृश्यतेचा कलंक भारतभूमीच्या कपाळावरून मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी जिवाचे रान केले. लोकांना समजावून अस्पृश्यता संपली नाही आणि अत्याचार थांबले नाहीत .धर्मांतराचा ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांनी घेतला नसता तर या प्रश्नाचे गांभीर्य आजही कमी झाले नसते, हे मान्य केले पाहिजे.

त्यामुळेच दीक्षाभूमीवर झालेल्या धर्मांतराला समस्त मानवजातीच्या आणि त्यातही मानवतावादी चळवळींच्या इतिहासात अग्रस्थान मिळाले आहे. बंडखोरीला देखील सहृदयतेचे कोंदन लावता येते हे या महामानवाने लाखो अनुयायांसह बुद्ध धम्माचा स्वीकार करून अलम दुनियेला दाखवून दिले. केवळ बुद्धधम्माचे पूनुरुत्थान हे त्यांचे ध्येय नव्हते .या मातीत खितपत पडून असलेल्या, आत्मभान आणि आत्मसन्मान गमावलेल्या आणि अत्याचारांना सातत्याने बळी पडूनही पेटून उठत नसलेल्या कोट्यावधी माणसांच्या यातना संपवणे हे त्यांचे ध्येय होते. विज्ञानवादी आणि इहवादी अशा प्रकारची मांडणी करणाऱ्या बुद्धधम्माचे अध्यात्म त्याच्या माणुसकीच्या सर्वोच्च शिकवणीत समावले आहे. साऱ्या जगात माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी एवढे मोठे परिवर्तन घडून आले याचे एकही उदाहरण सापडणार नाही . जिथे कुठे माणूसपण पराभूत होताना, चिरडून टाकले जाताना दिसत असेल, तेथे हस्तक्षेप करायला हवा. बुद्धाच्या विचारांची मूलभूत प्रेरणा हीच होती.

हे सर्वांना माहीत आहे की डाँ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 या अशोका विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर केले. त्यांनी आपला जुना धर्म त्यागून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 1935 साली येवला येथे त्यांनी जाहीर सभेत अशी घोषणा केली होती .त्यानुसार त्यांनी धर्मांतर केले.. बाबासाहेबांना धर्मांतर करताना यातून समाजाची अंधश्रद्धेतून पूर्णपणे मुक्तता ,जातीयतेचा पूर्णपणे नायनाट, उच्च-नीचतेला, तिलांजली आदर्श समाजनिर्मिती, शक्तिशाली समाज संघटन ,धार्मिक विकास इत्यादींचा समावेश करून समाजाचे चित्र बदलायचे होते. ज्याप्रमाणे महासमुद्राला सर्व नद्या जाऊन मिळतात व आपले स्वतःचे अस्तित्व संपवून समुद्रात विलीन होऊन जातात. समुद्रात हे या नदीचे पाणी किंवा ते त्या नदीचे पाणी ओळखता येत नाही, त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचेसुद्धा आहे. बौद्ध धम्मात प्रवेश केल्यानंतर जात ,धर्म, पंथ ,संप्रदाय सर्व विलीन होऊन जातात. जात ,धर्म, पंथ, संप्रदाय शिल्लक राहत नाही. याच दिवशी तथागत गौतम बुद्धाने गृह त्याग केला होता,1956 ला 2500 वर्ष पुर्ण झाली होती. काही काळानंतर, सम्राट अशोकाने याच दिवशी कंलीग युध्द जिंकून त्यात झालेला घातपात बघून ..शस्त्राचा तलवारीचा त्याग करून, बुध्दाच्या अष्टांगिक मार्गावर मार्गक्रमण केले. या दिवसाची आठवण स्मरणात ठेवून. बौद्ध धम्माचा इतिहास समोर ठेवत ..

डॉ. बाबासाहेबानी 1956 ला 14 आक्टोबंर या दिवशी बौद्ध धम्माची दिक्षा दिली. असे महत्त्व या दिवसाचे आसल्यामुळे धनज यथे एकता जयभीम क्रांती मडळ धनज यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या आध्यक्ष स्थानी परमेश्वर झाटे होते. प्रमुख उपस्थिती सरपंच देवानंद पाचपुते ,प्रकाश आमले माजी सरपंच ,आनाजी बोबंले तंटामुक्ती आध्यक्ष, दत्तप्रसाद जाधव, नासर देशमुख युवा सैना युवा अधिकारी पोफाळी , सुखदेव व्यवहारे, गौतम ढोबळे ग्रा.सदस्य, मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश डोगंरे यांनी केले तर आभार एकता जयभीम क्रांती मडळ धनज चे आध्यक्ष चरण डोगंरे यांनी केले. प्रास्ताविक अमोल जोगदंडे यांनी तर त्रिशरण पंचशील गहेणाजि पठाडे यांनी सामुहिक रित्या घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासीका व गावकरी हजर होते.

यावेळी एकता जयभीम क्रांति मंडळ धनज
यांचा वतीने प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज च्या सर्व टीम चे स्वागत करण्यात आले व सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देणून सन्मान करण्यात आला ,कोरोना काळात गावातील मुलांना शिक्षणाचे माध्यम सुरू करुन 1ली ते 12 वी च्या मुलांना मोफत मार्गदर्शन व शिक्षण दिल्या बदल हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमा च्या यशस्वी ते साठी एकता जयभीम क्रांती मंडळ धनज च्या सर्व सदस्य यांचे मोलाचे योगदान राहिले.