गौतम नगर गंगाखेड येथे सम्राट अशोका विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

94

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16ऑक्टोबर):-शहरातील गौतम नगर येथे सम्राट अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवामध्ये साजरा करण्यात आला सुरुवातीस चंद्रमणी बुद्ध विहार येथे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर गौतम नगर येथे अंजनाबाई सावंत यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण यशवंत शेळके व ज्ञानोबा लांडगे या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकररावजी गुट्टे हे उपस्थित होते सोबत रासपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीप आळनूरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस कैलास झुंजारे माजी तालुका अध्यक्ष मिलिंद कांबळे, नगरसेवक सत्यपाल साळवे,अँड मिलिंद शिरसागर,राजू शेख,राम साळवे,लक्ष्मण साळवे,सुमित कामत,शेखर ढेरे,रामराव साळवे, बाबुराव गायकवाड,सखाराम पंडित,बाळासाहेब साळवे, गवळणबाई लांडगे,सीताबाई साळवे,मथुराबाई कांबळे, कुशावरती पंडित,सुंदरबाई गायकवाड,बेबीनंदा साळवे, चंद्रकला साळवे आदीसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा चे वाचन करण्यात आले सायंकाळच्या सत्रामध्ये सचिन मस्के व संच यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास गौतम नगर व परिसरातील महिला,पुरुष,युवक व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम नगर युवक मित्र परिवाराने परिश्रम घेतले.