धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16ऑक्टोबर):-येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला उरवेला महिला मंडळ यांच्यावतीने पंचशील ध्वजारोहण करून त्रिसरण पंचशील, बुद्ध वंदना घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी नवनाथ साळवे  लहान मुलांच्या वतीने बुद्ध वंदना घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव ,सोपान कांबळे,रणधिरराजे भालेराव, चिंतामणी साळवे ,शीलवंत कांबळे हे उपस्थित होते.

तथागत नगर या ठिकाणी विलासराव जंगले (आण्णा ) अध्यक्षतेखाली प्रमोद मस्के , तुकाराम तांदळे नगरसेवक , एम.बी. गोटमुकले , सुरेश साळवे , राहूल गायकवाड, आबासाहेब उपाडे , दुर्गानंद वाळवंटे , माधवराव सावंत , नवनाथ खंदारे , वेजनाथ शिंदे , पैठणे बाबा , न्यंकटभाऊ मुंढे ,प्रा. भगवान गायकवाड, सिताराम जंगले , लिंबाजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत, महीला उपासी विमलबाई सावंत, शिलाबाई वाळवंटे , लक्ष्मीबाई कांबळे , कुसुमताई मुंढे , अस्मिता ठोके , राधाबाई मस्के, सोनाली गोदाम , प्रियंका सरवदे , मयुराबाई देवरे , रंजनाताई तुपे, पैठणे ताई , प्रज्ञा देवरे, प्रज्ञाताई कदम , मिराताई व्हावळे , संध्या जगतकर , उषा गायकवाड , दिव्या संबोधी ठोके नंदीनी गायकवाड ,सानु सावंत, रावसाहेब मस्के , उमेश तुपे , मेघानंद गोदाम , गौतम कदम , माणिकराव शिंदे , वैजनाथ मुजमुले , मधुकर जोंधळे , सिद्धार्थ कांबळे ,सुशिल सावंत, लक्ष्मण व्हावळे , राजरात्न देवरे , दिलिप पैठणे यांच्या वतीने वंदनासह अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED