गणपती व दुर्गा उत्सवात नशाबंदी मंडळाची व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16ऑक्टोबर):-नुकताच गडचिरोली शहरात गणेश आणि दुर्गा उत्सवाचे छोटेखानी स्वरूपात कार्यक्रम संपन्न झाले. शासकीय निर्देशाप्रमाणे कोरोना नियमांचे पालन करून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली द्वारा समाजमनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे. कोरोनामुळे स्वच्छतेचे महत्त्व सा-यांना पटले. हाच मानवी स्वास्थांविषयक विचार घेऊन नशाबंदी मंडळाने स्वच्छता आणि व्यसनमुक्ती विषयावरील जनजागृतीपर चित्र प्रदर्शनी कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ, कात्रटवार सभागृहातील नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळ ,इंदिरा गांधी चौकातील दुर्गा उत्सव मंडळ तसेच देसाईगंज वडसा येथील दुर्गा उत्सव मंडळ फवारा चौक आदी ठिकाणी पोस्टर प्रदर्शनी लावून जनजागृतीचे काम केले.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नशाबंदी मंडळ जिल्हा शाखेचे संघटक संदीप कटकुरवार ,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , उदय धकाते , प्रा.राजेश कात्रटवार, अभिजीत कोरडे आदींनी हे प्रदर्शन आयोजनासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे उत्सवाला येणाऱ्या महिला पुरूष मंडळींना समाजातील वाढती व्यसनाधिनता आणि सिगारेट ,तंबाखू , दारू या सारख्या व्यसनांपासून संसाराची कशी राखरांगोळी होते हे चित्र प्रदर्शनी मधून समजून घेता आले . महापुरूषांचे व्यसनमुक्ती संदर्भातील विचार वाचनीय असून ते शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता उपयोगी असल्याने त्यासंबंधी पत्रके वाटण्यात आली.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED