पीक कर्जाचे वाटप त्वरीत करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आंदोलनाचा इशारा

25

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.16ऑक्टोबर):- तालुक्यातील अजून काही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झालेले नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिवती तालुक्याच्या वतीने भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आणि शेतकऱ्यांना त्वरीत पीक कर्जाचे वाटप करा अन्यथा बॅंकेच्या समोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला खरिप हंगाम संपत आला तरी सर्विस एरिया परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाचे वाटप झाले नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे खरिप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशी,तूर,ज्वारी,मुंग, उडीद आदी पीकाची लागवड केली आहे गत वर्षी परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी संकटात आहे.

पीक कर्ज घेऊन पेरणी करावी अशी आशा असताना अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झाले नाही.शेतकऱ्यांनी सावकारा कडून कर्ज काढून पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरीत करावे या २ दिवसात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले नाही तर दि. २० आॅक्टोंबर रोजी शेतकऱ्यांना घेऊन बॅंकेच्या समोर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका जिवतीच्या वतीने करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला