आकाश इन्स्टिट्यूट’ ची नॅशनल स्कॉलरशिप, ANTHE 2021

🔹इयत्ता VII-XII विद्यार्थ्यांना देते आहे 100% पर्यंतची शिष्यवृत्ती

🔸इयत्ता 5 विद्यार्थ्यांसमवेत एका पालकाला मोफत नासा सहलीची संधी

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.16ऑक्टोबर):- आकाश नॅशनल टॅलेंट हंट एक्स्झाम (ANTHE) 2021, ही आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (AESL)च्या मुख्य वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षेची बाराची आवृत्ती आहे. प्रवेश परीक्षांमधील राष्ट्रीय मातब्बर असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड संस्थेत इयत्ता VII-XII वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्याकरिता सज्ज आहे. या संस्थेतील बहुतांशी विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेण्यास उत्सुक असल्याने नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षा देण्यासाठी तयारी करत असतात.

देशात 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत 4-12 डिसेंबर 2021 दरम्यान दोन्ही, म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ANTHE 2021 चे आयोजन करण्यात येणार आहे. ट्युशन फीवर शिष्यवृत्तीशिवाय सर्वोच्च गुणांची कमाई करणाऱ्यांना रोख पारितोषिक मिळणार आहे.

नमूद करण्यात आलेल्या सर्वोच्च 5 कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका पालकासमवेत नासाच्या मोफत सहलीची संधी मिळणार असल्याने यंदा ही एक मोठी पर्वणी ठरेल.

अतिरिक्त लाभ म्हणून, जे विद्यार्थी ANTHE करिता पात्र असतील, त्यांना मोफत मेरिटनेशन स्कूल बुस्टर कोर्स करण्याची संधी मिळेल. मेरिटनेशन ही एईएसएलची उपकंपनी आहे.

सर्व परीक्षा दिवसांत सकाळी 10:00 – संध्याकाळी 07:00 या वेळेत एका तासाची ANTHE परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. तसेच ऑफलाइन परीक्षा 5 डिसेंबर आणि 12 डिसेंबर 2021 कालावधीत दोन सत्रांत सकाळी 10.30 – 11.30 आणि संध्याकाळी 04.00 – 05.00 दरम्यान देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत कोविड-19 मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करत आकाश इन्स्टिट्यूटच्या सर्व 215+ केंद्रांवर संपन्न होईल. विद्यार्थी स्वत:च्या सुलभतेने एक तास निवडू शकतील.

ही परीक्षा एकंदर 90 गुणांची असून त्यात 35 बहु-पर्यायी प्रश्नांचा समावेश असतो. हे प्रश्न इच्छुक विद्यार्थ्यांच्या इयत्ता आणि शाखांच्या अनुरूप असतील. इयत्ता VII-IX विद्यार्थ्यांना विचारण्यात असलेले प्रश्न हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि बौद्धिक क्षमतांवर आधारित असतील. इयत्ता Xमधील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आणि बौद्धिक क्षमतांवर आधारित विषयावर परीक्षा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि बौद्धिक क्षमता विषयाची परीक्षा द्यावी लागेल. त्याचरीतीने NEET परीक्षेचे उद्दिष्ट असणाऱ्या इयत्ता XI-XII विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयावरील प्रश्न विचारण्यात येतील आणि अभियांत्रिकी इच्छुकांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासंबंधी परीक्षा द्यावी लागणार आहे.

ANTHE 2021 करिता ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षांची घोषणा झाल्यावर अनुक्रमे 3 दिवस आणि 7 दिवसांपूर्वी परीक्षा प्रवेश अर्ज सादर करता येतील. परीक्षा शुल्क हे रु. 99 याप्रमाणे राहील. हे शुल्क ऑनलाइन किंवा थेट नजीकच्या आकाश इन्स्टिट्यूट केंद्रावर भरता येईल.

इयत्ता X-XII विद्यार्थ्यांसाठी ANTHE 2021 चे निकाल 02 जानेवारी, 2022 रोजी; तर इयत्ता VII-IX विद्यार्थ्यांचे निकाल 04 जानेवारी, 2022 रोजी जाहीर करण्यात येतील.

ANTHE 2021 विषयी बोलताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले की, “डॉक्टर आणि आयआयटीयन बनण्याचे स्वप्न आपल्या कवेत आल्याने साहजिकच ANTHE ला वर्षानुवर्षे विद्यार्थी वर्ग आणि पालकांकडून भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. वैद्यकीय महाविद्यालयात जागा मिळवण्यासाठी किंवा आयआयटी, एनआयटी अथवा कोणत्याही केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकरिता कोचिंगचा मोठा परिणाम दिसून येतो. 2010 मध्ये आम्ही ANTHE चे बीज रोवल्यापासून देशातील पात्र परंतु शिकवणीपासून वंचित विद्यार्थ्यांना मौल्यवान कोचिंग प्रोग्राम उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. विद्यार्थ्यांना ते असतील तिथे नीट आणि आयआयटी-जेईई परीक्षांची तयारी स्वत:च्या सोयीने करण्याची संधी ANTHE ने दिली. मागील अनेक वर्षांप्रमाणे लाखो विद्यार्थी ANTHE 2021 चा उपयोग करून घेतील आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने अमूल्य पाऊल उचलतील हा विश्वास आम्हाला वाटतो.”
आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) विषयी:

आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ही वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा (जेईई), शाळा/बोर्ड परीक्षा आणि एनटीएसई, केव्हीपीवाय आणि ऑलंपियाड्ससारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक परीक्षा पूर्वतयारी सेवा आहे. “आकाश” ब्रँड हा गुणवत्तापूर्ण परीक्षा तयारीशी आणि विविध वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या निवडीशी संबंधीत आहे.

परीक्षा तयारी क्षेत्राशी 33 वर्षांचा कार्यकारी अनुभव गाठीशी असणाऱ्या कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परिक्षांच्या निवडीचा मोठा पर्याय आणि पॅन इंडिया नेटवर्कची 200 हून जास्त आकाश केंद्रे (फ्रेंचायजी सह) आणि 250,000 हून जास्त विद्यार्थी संख्या आहे.

आकाश ग्रुपकडे थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (BYJU’S) तसेच जगातील सर्वात मोठी खासगी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनची गुंतवणूक आहे.

www.aakash.ac.in
ANTHE, आकाश इन्स्टिट्यूट’ ची नॅशनल स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता VII-XII करिता असून 4-12 डिसेंबर 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे
• नमूद करण्यात आलेल्या इयत्तांमधील 5 विद्यार्थ्यांना एका पालकासोबत नासाला भेट देण्याची संधी मिळेल
• 2010 पासून, ANTHE च्या वतीने 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत
• शिष्यवृत्ती व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मोफत मेरीटनेशन स्कूल बुस्टर कोर्स मिळणार आहे

For more details, please log in to https://anthe.aakash.ac.in/anthe

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED