जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुर्ला येथे डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम जयंती

33

🔹”वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466

यवतमाळ(दि.17ऑक्टोबर):-मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुर्ला ता. झरी जिल्हा यवतमाळ येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेंद्र मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सुर्ला च्या सरपंच सौ. उषाताई दिवाकर कुडमेथे, ग्रामपंचायत तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री मंगेश ढोरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण आडे होते.

यावेळी मराठी भाषा संवर्धन संस्थे कडून शाळेतील इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके व थोर पुरुषांची जीवनचरित्र भेट देण्यात आलीत. व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना अधिकाधीक वाचनासाठी प्रेरित करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. उषाताई कुडमेथे यांनी “विद्यार्थ्यांन मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप उपयुक्त असून मराठी भाषा संवर्धन संस्था विद्यार्थ्यांन मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी चांगले उपक्रम राबवित आहे” असे मत व्यक्त केले.

तर ग्रामीण व सीमावर्ती भागात मराठी भाषा संवर्धनाचे खरे कार्य मराठी भाषा संवर्धन संस्था करत असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेंद्र मेश्राम यांनी म्हटले.

शाळेचे जेष्ठ शिक्षक श्री राजेश मेश्राम यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश बोबडे यांनी केले.तर सूत्रसंचालन मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पेंढरवाड यांनी केले.

उपस्थित मान्यवर व संस्थेचे आभार जेष्ठ शिक्षक श्री राजेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला श्री गंगाधर बलकी सर व विद्यार्थी उपस्थित होते.