रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर

43

🔸राष्ट्रीय सेवा योजना व आरोग्य विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार यांच्या सहकार्याने लसीकरण शिबीर

✒️चांदुर बाजार(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चांदुर बाजार(दि.17ऑक्टोबर):- स्थानिक गो. सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना द्वारे संथाध्यक्ष दादासाहेब टोम्पे यांच्या वाढदिवसानिमित्य आरोग्य विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार यांच्या सहकार्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक यांच्याकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीर आयोजत करण्यात आले होते. २० ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरु होत असून शासनाच्या आदेशानुसार दोन्ही डोस घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थीनी महाविद्यालयांत उपस्थित राहू शकतील असा आदेश असल्यामुळे महाविद्यालयात येण्यापूर्वी सर्व विद्यार्थींना लसीकरण करणे आवश्यक आहे. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना द्वारे लसीकरण शिबीर व कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी व परिसरातील पालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लसीकरणाच्या शिबीर आयोजनाचे आवाहन संस्थेचे सचिव श्री. भास्करदादा टोम्पे व प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके केले होते तर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, प्रा. डॉ प्रफुल्ल चौधरी व प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने यांच्या नियोजनात आणि प्रा. डॉ. रविकांत कोल्हे, प्रा. डॉ. अतुल सरोदे, प्रा. डॉ. बिजवे, डॉ. देवळे, डॉ. चोरे, डॉ. शिर्के, प्रा. पवार, डॉ. वारंगे, डॉ. देशमुख, डॉ. भगत, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. गायगोले त्यांची संपूर्ण टीम तसेच आशा वर्कर्स आणि तथा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. पवार, श्री. देशमुख, श्री, सावरकर, श्री. तायडे, श्री मोहोड, श्री. मकासरे आणि स्वयंसेवक श्रद्धा निंभोरकर, हर्षल ओकटे, तेजस्विनी डोंगरे, विद्यार्थी यांच्या सहकार्याने शिबिरातचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आवश्यकतेनुसार पुढील आठवड्यात कोविशील्ड व कोवॅक्सिन च्या पुन्हा उपलब्धतेनुसार आयोजन करण्यात येईल.