बसपाच्या तालुकाध्यक्षपदी प्रकाश अहिरे यांची फेरनियुक्ती

✒️श्रीरामपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

श्रीरामपूर(दि.17ऑक्टोबर):-बहुजन समाज पार्टी शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वतीने काल (17) रोजी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची आगामी निवडणुकांबाबत समीक्षा तसेच विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिर्डी लोकसभा प्रभारी राजू खरात होते.यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीरामपूर तालुक्यातील पक्षाची परिस्थिती पाहता विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी व त्यांची कामाची पद्धत, सध्याच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये बदल तसेच नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती होणे गरजेचे असल्याचे यापूर्वीच्या बैठकीत मांडण्यात आले होते. या सर्व बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

सध्या श्रीरामपूर विधानसभा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले . मा.प्रकाश अहिरे यांची श्रीरामपूर विधानसभा तालुकाध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती व्हावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून झाली. कार्यकर्त्यांच्या मागणीला तसेच श्री अहिरे यांनी मागील कालखंडात पक्षासाठी केले कामं, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असलेली तळमळ या सर्व बाबींचा विचार करून श्रीरामपुर विधानसभा तालुकाध्यक्ष पदी . मा.प्रकाश अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाल्यासारखे वातावरण या वेळी बघायला मिळाले. त्यांचा निवडीने त्यांच्यावर सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी विधानसभेतील विविध पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये महासचिव पदी सतीश परदेशी, शहर शाखाध्यक्ष पदी मीनाताई सोनवणे, शहर महासचिव पदी नंदाताई शिरसागर, शहर कोषाध्यक्षपदी लतीफा शेख यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाला विधानसभा कोषाध्यक्ष एकनाथ पवार, विधानसभा सचिव अरुण हिवराळे, शहर उपाध्यक्ष कल्पनाताई त्रिभुवन, शहर संघटक संजय सूर्यवंशी, संघटक कृष्णा कदम, शिरसगाव शाखाध्यक्ष प्रभाकर भोसले, सचिन खंडागळे, अनिल जाधव, अनिल बागुल, बबन व्यवहारे, तुकाराम शेळके, कैलास ठोंबरे, दीपक मोरे, मंगलताई पंडित, खैरी निमगाव शाखा अध्यक्षा कांताबाई पठारे , सुधाकर भोसले, मीनाताई कदम, मनिषा त्रिभुवन, युनूस शेख, सुरेश खरात, सिताराम जावरे , संदीप व्यवहारे, संदीप जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED