एकता जयभीम क्रांती मंडळ धनज तर्फे प्रज्ञासूर्य फाउंडेशन टिमचा जाहीर सत्कार

33

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.17ऑक्टोबर):-तालुक्यातील धनज येथील एकता जय भिम क्रांती मंडळ यांच्या वतीने सम्राट अशोक विजयादशमी व ६५ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त
प्रज्ञासूर्य फाउंडेशन धनज च्या सर्व टीमचा जाहीर सत्कार करण्यात आला .

कोरोणाच्या काळात गावातील मुलांना स्टडी सर्कलच्या माध्यमातून कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून शिक्षणाचे माध्यम सुरू करुन १ली ते १२ वी च्या मुलांना मोफत मार्गदर्शन व शिक्षण दिल्या बदल हा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परमेश्वर झाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच देवानंद पाचपुते, एकता जयभीम क्रांती मंडळाचे अध्यक्ष चरण डोंगरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अण्णाजी बोंबले, ग्रा. पं.सदस्य दत्तप्रसाद जाधव, ग्रा.पं. सदस्य गौतम ढोबळे, माजी सरपंच प्रकाश आमले ,सुखदेव व्यवहारे, नासेर देशमुख उपस्थित होते.

या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तेजस डोंगरे ,अजय पठाडे, प्रतिक महाजन ,विरेन डोंगरे ,प्रमोद गुव्हाडे ,वैभव वाळके इत्यादी युवावर्गाचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.