जनतेने नाकारलेल्या डॉ. अनिल बोंडेच्या आयत्या पिठावर रेघोट्या ! वरुड नगरपरीषदेमधील विकासकामाचा निधी खेचुन आणण्यात कवडीचाही संबंध नसतांना उद्घाटनाची फित कापने लज्जास्पद! वरुड तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची आज वरुड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २००९ मध्ये वरुड मोर्शी मतदार संघामध्ये डॉ. बोंडे यांना लोकांनी लोकनियुक्त म्हणुन निवडुन दिले विकासाची गंगा खेवुन आणतो असे आमिश दाखवुन १० वर्ष सत्ता अपभोगली परंतु वरुड शहरातील पिण्याच्या पाण्याचा सुध्दा सोडवू शकले नाही, त्याचप्रमाणे रस्ते, नालीबांधकाग, उद्यानविकास, सभागृहे, तसेच अनावश्यक कामे करण्याची डॉ. बोंडेची ऐपत झाली नसल्याचा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला. स्तत: एक डॉक्टर असतांना नागरीकांच्या आरोग्य सुविधेकडे लक्ष दिले नाही. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थित एक कोवीडचा दवाखाना उभा न करता फिरत्या पथकासारखे ५० रुपयाच्या गोळ्या वाटपाचा कार्यक्रम Whatsapp फेसबुक वर पुर्ण करीत होते. लोकांचे मृतदेह उघड्या डोळ्यांनी बघुन मनोमन आनंद व्यक्त करीत होते. शासनाने ब्लॅकलिस्ट मध्ये टाकललेल्या कंपनीला कंत्राट देऊन अव्वाच्या सव्वा वरुड नगरीतील नागरीकांवर कर लादण्याचे पाप डॉ. बोंडे यांनीच केले. शहरातील दारुदुकान बंदीचे नाटक करुन साईबाबा मंदिर परिसरातील पवित्र ठिकानी दारुचे दुकान आणण्याचे पाप या महापापी माणसाने केले. वरुड मोर्शीच्या विकासापेक्षा लाल दिव्याच्या स्वप्नात मशगुल असलेल्या सत्तापिपासू मानसाने गेल्या दहा वर्षात मतदार संघाचे पुर्ण वाटोळे केले आहे. म्हणुनच जिवंत लोकशाहीने माझ्या सारख्या एका फाटक्या कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. डॉ. बोंडे विकास पुरुष म्हणुन स्वत:ची पाठ स्वत: थोपाटण्यात धन्यता मानत आहे. परंतु वरुड शहरातील जनता सुज्ञ असून जनतेच्या हिताचे ठराव विरोधात घेण्याऱ्या व कंत्राटदाराकडून १० टक्के कमीशन वसुल करणाऱ्या किर्तीवंत नगरसेवकाच्या खांद्यावर बंदुक ठेवून विकास दाखविण्याचा लाजिरवाना प्रयत्न करीत आहे. परंतु १४ फेब्रुवारी २०२० ला उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी वरुड शहराकरीता ५ कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन दिला तसेच ५ जुलै २०२० ला मी स्वत: जिल्हा वार्षिक योजनेमधुन वरुड शहराला मिळणाऱ्या नियमित निधीपेक्षा ५ पटीने निधी (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे) नागरी सुवीधा योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये वरुड शहराच्या विकासाकरिता खेचुन आणले. सदरील निधी पालकमंत्री यशोगतीताई ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली मंजुर करुन आणले परंतु नगरपरिषदेमध्ये चालत असलेल्या कमीशनच्या खेळामुळे व अध्यक्षावर घेतलेल्या अविश्वासाचा नाटकामुळे दोन वर्ष जाणीव पुर्वक विकासकामे दूर ठेवल्या गेली. मार्च व जुलै २०२० ला मी मंजुर केलेल्या निधीचे कामे प्रत्यक्ष काम दिड वर्षापासुन चालू न करता ऐन निवडणुकाच्या तोंडावर डॉ. बोंडेच्या हस्ते उद्घाटन घेऊन स्वत: विकास कामे करण्यात नपुंसक असलेल्या बोंडेच्या हातुन मी आणलेल्या निधीच्या विकास कामाचे भुमीपुजन करण्याचा घाट नगरसेवकांनी मांडला मी आमदार म्हणुन निवडून आल्यानंतर १९/२० च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ कोटी ५० लक्ष रुपये मंजुर केलेल्या, राज्य शासनाच्या वतीने वैशिष्टयपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १४ फेब्रुवारीला ५ कोटी रुपये मंजुर केले. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत २६/०८/२०२१ ला २ कोटी ९७ लक्ष तसेच अतिरीक्त ३ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता जिल्हा नियोजन समीतीचा सदस्य या नात्याने मी मंजुर करुन घेतली आहे. वरुड शहराच्या तब्बल ५० वर्षाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून शहराकरीता ६४ कोटी ९३ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजना २९ जुलै ला मंजुर करुन घेतली तसेच शहराच्या रस्ते व सभागृहाच्या कामाकरिता दिनांक ३० सप्टेंबर २०२१ ला ७ कोटी ७१ लक्ष रुपये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजुर केले तसेच ३० सप्टेंबर २०२१ ला ७ कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी परत वरुड शहराकरीता मंजुर करुन दिलेले आहे. तसेच २१/२२ करिता २ कोटी रुपयाची तरतुद जिल्हा वार्षिक योजनेअंर्तगत स्वत: करुन घेतली आहे. त्यामुळे मी आणलेल्या निधीतील विकासकामाचा ६१ वर्षीय आदरणीय आजोबा व स्वयंघोषीत विकास पुरुष असणाऱ्या डॉ. बोंडेनी उदघाटन करुन आयत्या पिठावर रेघोट्या मारु नये असा सल्ला आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला. नगरसेवकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून, निवडणूकीच्या तोडावर उद्घाटनाचा स्वत:च्या जिवाला लाज वाटेल असा प्रकार करु नये. वरुड शहराकरिता १० वर्षाच्या कालावधीत आणलेला निधी तसेच माझा कोरोना संकट काळातील २ वर्षाचा निधी उघड्या डोळ्यांनी बघावा. असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, राष्ट्रवादी शहर प्रमुख तुषार देशमुख, नगरसेवक महेंद्र देशमुख, संकेत यावलकर, प्रभाकर काळे, जितू शाहा, संजय कानुगो, गौस अली, मनोज गुल्हाने, गुड्डू पेलागडे, जगविर सिंग भावे, प्रवीण देशमुख यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

26

🔹वरुड नगरपरीषदेमधील विकासकामाचा निधी खेचुन आणण्यात कवडीचाही संबंध नसतांना उद्घाटनाची फित कापने लज्जास्पद!

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.17ऑक्टोबर):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची आज वरुड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सन २००९ मध्ये वरुड मोर्शी मतदार संघामध्ये डॉ. बोंडे यांना लोकांनी लोकनियुक्त म्हणुन निवडुन दिले विकासाची गंगा खेवुन आणतो असे आमिश दाखवुन १० वर्ष सत्ता अपभोगली परंतु वरुड शहरातील पिण्याच्या पाण्याचा सुध्दा सोडवू शकले नाही, त्याचप्रमाणे रस्ते, नालीबांधकाग, उद्यानविकास, सभागृहे, तसेच अनावश्यक कामे करण्याची डॉ. बोंडेची ऐपत झाली नसल्याचा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला.स्तत: एक डॉक्टर असतांना नागरीकांच्या आरोग्य सुविधेकडे लक्ष दिले नाही. कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थित एक कोवीडचा दवाखाना उभा न करता फिरत्या पथकासारखे ५० रुपयाच्या गोळ्या वाटपाचा कार्यक्रम Whatsapp फेसबुक वर पुर्ण करीत होते. लोकांचे मृतदेह उघड्या डोळ्यांनी बघुन मनोमन आनंद व्यक्त करीत होते.

शासनाने ब्लॅकलिस्ट मध्ये टाकललेल्या कंपनीला कंत्राट देऊन अव्वाच्या सव्वा वरुड नगरीतील नागरीकांवर कर लादण्याचे पाप डॉ. बोंडे यांनीच केले. शहरातील दारुदुकान बंदीचे नाटक करुन साईबाबा मंदिर परिसरातील पवित्र ठिकानी दारुचे दुकान आणण्याचे पाप या महापापी माणसाने केले. वरुड मोर्शीच्या विकासापेक्षा लाल दिव्याच्या स्वप्नात मशगुल असलेल्या सत्तापिपासू मानसाने गेल्या दहा वर्षात मतदार संघाचे पुर्ण वाटोळे केले आहे. म्हणुनच जिवंत लोकशाहीने माझ्या सारख्या एका फाटक्या कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली.डॉ. बोंडे विकास पुरुष म्हणुन स्वत:ची पाठ स्वत: थोपाटण्यात धन्यता मानत आहे. परंतु वरुड शहरातील जनता सुज्ञ असून जनतेच्या हिताचे ठराव विरोधात घेण्याऱ्या व कंत्राटदाराकडून १० टक्के कमीशन वसुल करणाऱ्या किर्तीवंत नगरसेवकाच्या खांद्यावर बंदुक ठेवून विकास दाखविण्याचा लाजिरवाना प्रयत्न करीत आहे.

परंतु १४ फेब्रुवारी २०२० ला उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी वरुड शहराकरीता ५ कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन दिला तसेच ५ जुलै २०२० ला मी स्वत: जिल्हा वार्षिक योजनेमधुन वरुड शहराला मिळणाऱ्या नियमित निधीपेक्षा ५ पटीने निधी (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे) नागरी सुवीधा योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये वरुड शहराच्या विकासाकरिता खेचुन आणले. सदरील निधी पालकमंत्री यशोगतीताई ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली मंजुर करुन आणले परंतु नगरपरिषदेमध्ये चालत असलेल्या कमीशनच्या खेळामुळे व अध्यक्षावर घेतलेल्या अविश्वासाचा नाटकामुळे दोन वर्ष जाणीव पुर्वक विकासकामे दूर ठेवल्या गेली.मार्च व जुलै २०२० ला मी मंजुर केलेल्या निधीचे कामे प्रत्यक्ष काम दिड वर्षापासुन चालू न करता ऐन निवडणुकाच्या तोंडावर डॉ. बोंडेच्या हस्ते उद्घाटन घेऊन स्वत: विकास कामे करण्यात नपुंसक असलेल्या बोंडेच्या हातुन मी आणलेल्या निधीच्या विकास कामाचे भुमीपुजन करण्याचा घाट नगरसेवकांनी मांडला मी आमदार म्हणुन निवडून आल्यानंतर १९/२० च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ कोटी ५० लक्ष रुपये मंजुर केलेल्या, राज्य शासनाच्या वतीने वैशिष्टयपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १४ फेब्रुवारीला ५ कोटी रुपये मंजुर केले. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत २६/०८/२०२१ ला २ कोटी ९७ लक्ष तसेच अतिरीक्त ३ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता जिल्हा नियोजन समीतीचा सदस्य या नात्याने मी मंजुर करुन घेतली आहे.

वरुड शहराच्या तब्बल ५० वर्षाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून शहराकरीता ६४ कोटी ९३ लक्ष रुपयाची पाणी पुरवठा योजना २९ जुलै ला मंजुर करुन घेतली तसेच शहराच्या रस्ते व सभागृहाच्या कामाकरिता दिनांक ३० सप्टेंबर २०२१ ला ७ कोटी ७१ लक्ष रुपये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंजुर केले तसेच ३० सप्टेंबर २०२१ ला ७ कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांनी परत वरुड शहराकरीता मंजुर करुन दिलेले आहे. तसेच २१/२२ करिता २ कोटी रुपयाची तरतुद जिल्हा वार्षिक योजनेअंर्तगत स्वत: करुन घेतली आहे. त्यामुळे मी आणलेल्या निधीतील विकासकामाचा ६१ वर्षीय आदरणीय आजोबा व स्वयंघोषीत विकास पुरुष असणाऱ्या डॉ. बोंडेनी उदघाटन करुन आयत्या पिठावर रेघोट्या मारु नये असा सल्ला आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला.

नगरसेवकांच्या खांद्यावर बंदुक ठेवून, निवडणूकीच्या तोडावर उद्घाटनाचा स्वत:च्या जिवाला लाज वाटेल असा प्रकार करु नये. वरुड शहराकरिता १० वर्षाच्या कालावधीत आणलेला निधी तसेच माझा कोरोना संकट काळातील २ वर्षाचा निधी उघड्या डोळ्यांनी बघावा. असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
यावेळी पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, राष्ट्रवादी शहर प्रमुख तुषार देशमुख, नगरसेवक महेंद्र देशमुख, संकेत यावलकर, प्रभाकर काळे, जितू शाहा, संजय कानुगो, गौस अली, मनोज गुल्हाने, गुड्डू पेलागडे, जगविर सिंग भावे, प्रवीण देशमुख यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.