आमदार देवेंद्र भुयारांच्या प्रयत्नांमुळे दीड वर्षीय चिमुकल्यावर मोफत शस्त्रक्रिया !

🔸२ लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया ; घटोळ कुटुंबाला मिळाला दिलासा !

✒️मोर्शी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोर्शी(दि.18ऑक्टोबर):-मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. त्यांनी आत्तापर्यंत शेतकरी, शेतमजूर, शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी चांगले काम केलं आहे. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत आहे.
माळीपूरा मोर्शी येथील यश चक्रधर घाटोळ दीड वर्षीय चिमुकल्याला आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने त्या चिमुकल्याला नवे आयुष्य मिळाले आहे.

दीड वर्षीय यश याच्या किडणीवर सूज आल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याकरिता 2 लक्ष रुपयांचा खर्च होणार असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला. आमदार देवेंद्र भुयार यांनी यश च्या तब्बेतीची दखल घेऊन क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मुंबई येथील एस आर सी सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून 2 लक्ष रुपयांची (PU valves fulguration operation ) लघवीच्या नळीचे ऑपरेशन मोफत करण्यात आल्यामुळे किडनी वरील सूज कमी करण्यात आली .

खासगी डॉक्टरांनी २ लाखापर्यंत उपचार खर्च सांगितल्या मुळे घटोल यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यासोबत भेटून आपली व्यस्था मांडली असता आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून यशला मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. आता यश पूर्ण ठणठणीत बरा होऊन घटोळ कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे घटोळ परिवाराने आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED