युवासेनेचा ११ व्या वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या आरोग्याची व मिळत असलेल्या सुविधांची विचारपूस

31

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि18ऑक्टोबर):- शहारातील पर्यावरण मंत्री सन्मान आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवासेना २०१० साली युवासेनेची स्थापना युवकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होवावे म्हणुन करण्यात आली,युवकांनी मोठ्या उत्साहात युवासेनेत याला सुरवात केली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शिक्षण, आरोग्य व रोजगार हमी साठी काम करत आहे.

आज याच युवासेनेचा ११ व्या वर्धापन दिनानिमित्त दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या आरोग्याची व मिळत असलेल्या सुविधांची विचारपूस करत,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे व युवासेना जिल्हा प्रमुख आकाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पोपहार व फळ वाटप दोंडाईचा शहर युवासेने तर्फे करण्यात आले.

यावेळी युवासेनेचे शहर युवाधिकारी सागर पवार,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार,युवासेना उपतालुका युवाधिकारी जगदीश पाटील, उपशहर युवाधिकारी,योगेश बोरसे,गणेश विसावे,लखन मराठे,निलेश विसावे,शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते,दीपक मराठे, विजय वाडीले, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते…