स्वप्निल भगत यांनी आपला पहिला पगार दिला बुध्दविहाराच्या बांधकामास दान

40

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)

यवतमाळ(दि.18ऑक्टोबर):- येथील स्वप्निल रवि भगत हा आगष्ट २०२१ ला पवई (मुंबई) येथील ओरियन ईनोव्हेशन या कंपनी मध्ये नोकरीला रूजू झाला असुन त्यांनी आपला पहिला पगार ७५ हजार रुपये यवतमाळ येथील बोधिसत्व बुद्धविहाराच्या पुढील बांधकामासाठी दान देण्याचे दि. १५ ऑक्टोबर रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी व ६५ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमीत्य बोधिसत्व बुद्धविहार येथील आयोजित कार्यक्रमात दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा स्वप्नीलचे वडील रवि भगत यांनी जाहीर केले आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस रुपेश वानखडे ,उपाध्यक्ष ललित बोरकर, सिद्धार्थ बनसोड, उत्तम कांबळे ,तालुकाध्यक्ष मोहन भवरे ,विजय कांबळे, अरुण खंडारे,वसंत शिंगाडे, किशोर उके, प्रकाश बागेश्वर ,अरविंद मेश्राम ,सिद्धार्थ पुडके, सुवर्णा भागेश्वर ,रमा पुडके ,विशाखा नन्नावरे, कुंदाताई बोरकर तसेच जिल्हा व तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी , सदस्य आणि उपासक-उपासिका उपस्थित होते.

या बोधिसत्व बुद्धविहाराचे बांधकाम दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या बोधिसत्व बुद्धविहाराच्या पुढील बांधकामासाठी आपल्या सर्वांच्या योगदानाची नितांत आवश्यकता आहे. तरीही आपल्या परीने धम्मदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवि भगत यांनी केले आहे.
स्वप्निलच्या या कार्याबद्दल त्याच्यावर सर्व स्थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.