आगरी, कोळी, कराडी उच्च शिक्षितांमध्ये बुद्धीचा दुष्काळ आणि मासळीचा दुष्काळ एक नैसर्गिक नाते!

29

अज्ञान हेच मानवी दुःखाचे मूळ कारण आहे” असे 2000 वर्षांपूर्वी महामाया एकविरापुत्र तथागत भगवान बुद्ध म्हणाले होते. अंधार घालविण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते, तशीच समाजाचे अज्ञान घालविण्यासाठी बुद्धीमंत हुशार नेतृत्वाची गरज असते.उरण पनवेल नवी मुबंई परिसरात नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन आणि सागराचेही संपादन झाले. त्याअगोदर सिडको एमआयडीसी यासाठीही भूसंपादन झाले.आज मुबंई पालघर ठाणे रायगड येथेही भूसंपादन होत आहे.यात सिडको आणि सेझ प्रकल्पामध्ये लोकनेते दि बा पाटील,ऑड दत्ता पाटील यांनी सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन करून प्रखर बुद्धिवादी भूमिका घेऊन प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात मोलाची भूमिका घेतली.त्यांनी केलेले युक्तिवाद आज जणू संपले आहेत. ?????

सिडको आणि सेझ यामध्ये किनारपट्टीवरील गावे इतरत्र विस्थापित करून या मौल्यवान जागा उद्योगपती भाडवलंदार याना विकून प्रचंड नफा कमविणे हा सरकारचा कपटी हेतू होता.याला विरोध झाला.तरीही उरणच्या न्हावा शेवा बंदरातील आणि आता विमानतळ प्रकल्पातील मच्छिमार आगरी कोळी कराडी समाजाची अवस्था…ना घर का ना घाट का?. अशी का झाली?.देशातील जमीन मालक जेव्हा प्रकल्पग्रस्त होतो तेव्हा त्याची जमीन जाते हे सामान्य बुद्धीच्या माणसाला समजते.परंतु जेव्हा मुबई ठाणे नवी मुबई जेएनपीटी बंदर एमआयडीसी यातील दूषित पाण्यामुळे समुद्र मच्छिमार मासे बाधित होतात,प्रकल्पग्रस्त होतात हे देशातील कोणत्याही विद्वानांस समजत नाही ???. मा पंत प्रधान मोदी आणि शहाण्या शहाना ही नाही. देशातील उच्चवर्णीय विचारवंत हे समुद्रातील जलवाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार हे मनुस्मृती धर्मानुसार पाप मानत आले.यातूनच राजर्षी शाहू महाराजांच्या इंग्लड प्रवासाला महापाप जाहीर करून पुण्यातील ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घ्यायला सांगितले.सागरी व्यवसाया बद्दलचा हा वैदिक ब्राह्मणी दृष्टिकोन उरण पनवेलचे वकील राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यातही यावा हे आमच्या मच्छीमारांच्या दुःखाचे मूळ कारण असावे?

समुद्राच्या मालकीसाठी आरमार उभारणारे सम्राट अशोक आणि छत्रपती शिवराय हे दूरदर्शी राजे ना उद्धव ठाकरेंनी समजून घेतले ना राज ठाकरेंनी?. ब्राह्मण मराठा इतिहासकारांनी शिवरायांना घोड्यावरून समुद्रात कधी उतरविलेच नाही.पुरंदरे च्या इतिहासातून महाराष्ट्रात समुद्राबाबत प्रचंड अज्ञानी राजकारणी प्रशासक आणि वकील समाजसेवक जन्मास घातले. ज्यांना समुद्र माहीत नाही त्यांचे पिढीजात अज्ञान समजू शकतो परंतु ज्यांचा जन्म सागरपुत्र आई वडील असलेल्या आगरी कोळी कराडी भंडारी खानदानात झालाय त्यांच्या बुद्धीचे दिवाळे निघावे..?. उच्चवर्णीय ब्राह्मण मराठा वैश्य जातींना आगरी कोळी ओबीसी एससी एसटी यांचा देशाच्या संपत्तीवर अधिकार असतो हेच मान्य नव्हते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच आगरी कोळी ओबीसी मागासवर्गीयांना कूळ कायद्याने जमीन मालकी दिली!.अर्थात हा निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडणारे ने आमचे हक्काचे नेते होते.त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नारायण नागु पाटील ,दत्ता पाटील,दि बा पाटील ही बुद्धिवादी मंडळी लढली.आमच्या मागास जातींचा संघर्ष अधिकार नाकारणाऱ्या उच्चजातीय सरकार विरोधात असतो.हे मान्य केल्यानंतरच लढाईची दिशा ठरते. “ज्याचे आरमार त्याचा समुद्र” ही दूरदृष्टी शिवरायामध्ये होती ती स्वतःस मराठा समजणाऱ्या कोणत्याही सत्ताधारी नेतृत्वात नाही अगदी वयोवृद्ध पुरोगामी सन्माननीय शरद पवारा मध्येही नाही!. ज्यांनी दि बा पाटील साहेबांकडे जिताडी खाल्ली.

आज 2013 ने सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी गाबित यांचा समुद्रावरील मालकी हक्क आणि पुनर्वसन अधिकार कायद्याने मान्य केला आहे.सर्वच वकील राजकीय नेते बुद्धिमान सामाजिक चलवळीच्या नेतृत्वास हे माहीत असताना.सिडको “साडे बावीस टक्के” धोरण राबविणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांनी मच्छिमार प्रकल्पग्रस्ताना पुनर्वसन नाकारले.आमच्यातील सर्वच शिक्षित कायदे तज्ञांच्या बुद्धीचा हा पराभव आहे असे मला वाटते.मुबंईच्या महिला मच्छीविक्रेत्या,सामान्य खलाशी आणि समुद्र यांचे काडीचीही माहिती नसणारे बिल्डर ठेकेदार यांचे आर्किटेकट वकील हे मच्छीमारांच्या वतीने कोर्टात 2013 च्या कायद्याने दिलेले पुनर्वसन अधिकार नाकारण्याची खेळी खेळत आहेत.मा उच्च न्यायालयात.मा सर्वोच्च न्यायालयात याचिका मुद्दाम हरत आहेत.टाटा सामाजिक संस्थे सारख्या संस्था मच्छीमारांचे चुकीचे सामाजिक आघात अभ्यास अहवाल सादर करीत आहेत.इतर छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्था मच्छीमाराना हातोहात फसवत आहेत.

कोळीवाडा गावठाण यातील शिक्षित लोक आपल्याच गरीब अज्ञानी बांधवांचा सागरी हक्क नाकारून दलाली खात आहेत. शिकलेल्या लोकांनी आपल्या गरीब भावाना फसविण्याचा हा प्रकार मनुस्मृतीच्या धोरणाचा भाग असावा.??? नवी मुंबई विमानतळातील मच्छिमार बांधवांची “साडे बावीस टक्के” धोरणात झालेली फसवणून ओबीसी बुद्धीमंतांना लाजिरवाणी गोष्ट आहे.म्हणूनच या सरकारी जीआर रुपी धोरणास आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहोत.सर्वच मच्छिमार बांधवांनी कोळीवाडा गावठाण यातील रहिवाशी आणि आमची वकील प्राध्यापक राजकीय नेते यांनी आपला कृतिशील सहभाग दाखवून डोक्यातील बुद्धीचा आणि नंतर येणाऱ्या समुद्रातील मच्छीमारीचा दुष्काळ संपविण्यासाठी आपले बहुमोल सहकार्य द्यावे ही हात जोडून नम्र विनंती!

✒️राजाराम पाटील, उरण{मच्छिमार बोट मालक.सागरावर निस्सीम प्रेम करणारा एक सागरपुत्र}मो:-9619801684