गांव तिथे भारतीय बौद्ध महासभा – ऍड.सत्यविजय उराडे

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.18ऑक्टोबर):- “गांव तिथे भारतीय बौद्ध महासभा व घर तिथे बौद्ध महासभा सभासद ” या अभियानातुन सम्पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेची चळवळ ताकतीने उभी केली जाईल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून भारतीय बौद्ध महासभेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड.सत्यविजय उराडे यांनी केले ते 16 ऑक्टोबरला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित 65 व्या धम्म चक्रप्रवर्तन दिन समारोह व कोविड योद्धा सत्कार समारंभ कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते, जयंत टॉकीज चौकातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे निवासस्थानातील मृणाल खोब्रागडे सभागृहात सदर नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी परिचय कार्यक्रम घेण्यात आला पुढे बोलताना ऍड. उराडे म्हणाले की जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे तसेच जिल्ह्यात एडवायझरी काउन्सिलिंग लवकरच गठित करणार असल्याचे त्यांनी उपस्थितीतांना सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते खुशाल तेलंग सर म्हणाले की धम्म चक्र व दुःख चक्र न समजल्याची खन्त त्यांनी व्यक्त केली तसेच सत्कार मूर्ती डॉ. बंडू वामनराव रामटेके यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान केला व म्हणूनच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखे तर्फे डॉ. बंडू रामटेके यांचा धम चक्र प्रवर्तन दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला .या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजकुमार जवादे आपल्या भाषणात म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बौद्ध धम्मानुसार या देशातील दुःख आणि दारिद्रय दूर करण्यासाठी संविधानाची व खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणारे लोकप्रतिनिधी पाठविणार नाही तो पर्यंत तथागत गौतम बुद्धानी सांगितल्यानुसार समाज दुःख मुक्त होनार नाही.

डॉ. बंडू रामटेके यांनी देखील सत्काराला साजेसे विचार व्यक्त केले .माजी नगरसेवक नामदेव पिंपळे म्हणाले की राजरत्न आंबेडकर यांचे उमदे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेला मिळाले आहे वैज्ञानिक वारसा देणारी ही चळवळ आहे महाराष्ट्रच नव्हे तर सम्पूर्ण भारतात ही चळवळ उभी होत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी व तालुका प्रमुखांची घोषणा करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रपूर जिल्ह्याचे वरिष्ठ नेते प्रा. डॉ.,टी.डी.कोसे2 यांनी तर आभार प्रदर्शन नवनियुक्त जिल्हा सह सचिव कात्यायन शेंडे यांनी मानले यावेळी जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते