धम्मानुवर्तन हिच व्यक्ती,समाज,संस्था संघटनांची जबाबदारी : शाम तागडे

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.१८ऑक्टोबर):-पंचशील,आर्यष्टांग मार्ग आचरणातून दुःख मुक्ती हाच तथागत बुद्धाच्या जीवन तत्वज्ञान,बुद्ध धम्माचा पाया असून मानवी देहातील विकार-वासना,द्वेष,मत्सर,हाव-हव्यास,मोह त्यागल्या शिवाय मानव सुखी होणे कठीण आहे.समस्त मानवी कल्याणाचा विज्ञानवादी धम्माचे धम्मानुवर्तन (धम्म आचरण) हिच व्यक्ती,समाज,संस्था संघटनांची जबाबदारी आहे असे मत महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव शाम तागडे यांनी मुक्ती महोत्सव २०२१ मध्ये आयोजित ऑनलाईन व्याख्यानात बोलताना व्यक्त केले.

धर्मांतर घोषणेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवला चे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय ऑनलाईन मुक्ती महोत्सवाचे समारोप सत्रातील धम्म चळवळीची दिशा व धम्म प्रचारक व्यक्ती,संस्था संघटनांची जबाबदारी या विषयावर शाम तागडे बोलत होते.धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी बाल-युवक युवतींचे अभ्यासवर्ग,धम्म संस्कार शिबीर होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.धम्म प्रचार प्रसार करतांना त्या व्यक्ती,संस्था, संघटनांनी पंचशील, आर्यष्टांग मार्गाचे अनुपालन करणे आवश्यक असून धम्म हा आपल्या वर्तन,वाणी,आचार-विचारातून दिसायला हवा असे हि तागडे म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येवला,पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ हे होते.ईकरा शाह हि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.मिलिंद गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले.तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी,सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के यांनी ससूत्रसंचालन केले.अझहर शाह सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक, प्रवर्तक शरद शेजवळ यांनी आभार मानले.
शैलेंद्र वाघ सर,सुभाष वाघेरे सर,सुरेश खळे,ज्योती वाघ,अक्षय गांगुर्डे,अमीन शेख,वनिता सरोदे-पगारे,सुरेशकाका सोनवणे,अभय लोखंडे,प्रशिल शेजवळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED