विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक मधुकर मुंढे यांना गंगाखेडमध्ये आदरांजली

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18ऑक्टोबर):-स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाचे माजी संचालक प्रा मधुकर मुंडे यांना आनंद विहार येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राम किशन लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला गेल्या वर्षी कोरणा महामारी च्या काळात प्राध्यापक मुंडे यांनी अखेरचा निरोप घेतला सहवासातील आठवणी वर बोलताना विलासराव जंगले यांनी आठवणींना उजाळा देत म्हणाले मुळगाव सारडगाव तालुका परळी येथील रहिवासी असलेले मधुकर मुंडे स्वभावाने जिद्दी असल्यामुळेच त्यांनी पुरोगामी चळवळीची धुरा सांभाळत बाबा आढाव यांच्या सोबत फुले शाहू आंबेडकर जोपासण्याचे काम केले.

पुरोगामी चळवळीची धुरा सांभाळत त्यांना अनेक संकटे झेलावी लागली शैक्षणिक विचार समाजा समोर मांडत असताना आधुनिक विचार महत्त्वाचा मांडत त्यांनी युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने चे शैक्षणिक कार्य केले आहे यावेळी नारायण तांदळे समाधान आघाव संजय यादव यांचेही मनोगते झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल साबणे यांनी व्यक्त केले