शेततळ्यात बुडून १९ वर्षीय यूवतिचा दुर्दैवी मृत्यू

31

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.१९ऑक्टोबर):- येवला तालुक्यात विसापूर शिवारात राहनारे आंबेवडी येथीला बोराडे वस्तीवर राहणारे दत्तात्रय बोराडे यांची मुलगी उर्मिला दत्तात्रय बोराडे वय १९ वर्ष हि आपल्या शेततळ्यांवर माश्या ना खाद्य देण्या साठी गेली असता तिचा अचाणाक पाय घसल्याने तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला तिचा मृत्यू ची बातमी परिसरात पसरल्याने हाळ हाळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेतली आणि येवला पोलिस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यू ची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार माधव सानप पोलिस काउनस्टेबल गौतम मोरे हे करत आहेत.