






✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.19ऑक्टोबर):-गेल्या अनेक वर्षापासून गर्जे कुटुंबीय तलवाडा जातेगाव सह गेवराई तालुक्यात सामाजिक धार्मिक वारसा जपत आले असून स्व, महादेव बुवा महाराज गर्जे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योजक गहिनीनाथ आण्णा गर्जे यांनी जनसेवेचा वारसा आजवर चालत आणलेला आहे पुढे प्रितम भैया गर्जे यांनी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात आपले पाऊल अगदी शेकडो तरुणांच्या साथीने घोड दौड सुरू केलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गेवराई तालुक्यातील तलवाडा व जातेगाव जिल्हा परिषद गटातून युवक नेतृत्व प्रितम भैय्या गर्जे यांनी निवडणूक लढवावी अशी चर्चा सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील तलवाडा नजीक विठ्ठल नगर येथील सांप्रदायिक सामाजिक क्षेत्रात योगदान असणारे स्वर्गीय महादेव बुवा महाराज गर्जे यांच्या विचारावर पावलावर पाऊल ठेवून उद्योजक गहिनीनाथ अण्णा गर्जे यांनी सतत जनसेवा केली आहे,स्व महादेव बुवा महाराज गर्जे कुटुंबीयांची तिसरी पिढी, प्रितम भैया गर्जे यांनी ग्रामीण भागात काम करत आपलं वलय वडिल व आजोबा प्रमाणे तयार केले असून सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रात सतत धावून येणारा आणी निस्वार्थ भावनेने प्रत्येकाला मदत करणारा चेहरा म्हणून प्रितम भैया तरुणांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तलवाडा व जातेगाव गटातून भैय्याच्या नावाची पसंतीची चर्चा सध्या ग्रामीण भागात तरुणांच्या चर्चेतून दिसून येत आहे.
प्रितम भैय्या गर्जे यांनी तलवाडा व जातेगाव गटात संवाद दौरा करून शेतकरी शेतमजूर व मतदारांच्या गाठीभेटी घेऊन पुढील दिशा ठरवावी अशी चर्चा युवकांनी सध्या जोरदार लावून धरली असून त्यात प्रितम गर्जे यांनी थेट जनतेसाठी आता रिंगणात उतरण्याची गरज आहे जातेगाव तलवाडा गटातुन आरक्षण काय सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले असून युवक व मतदार यांच्या मागणीनुसार प्रितम भैय्या गर्जे हे जातेगाव व तलवाडा गटातुन निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होतील अशी अपेक्षा कार्यकर्ते हितचिंतक युवक करत आहे





