खळेगाव दादेवाडी ते धुमेगाव रस्त्यावरील लोकवर्गणी केलेला रस्ता गेल्यामुळे शेतकरी शेत वस्तीवरील दूध व्यवसाय कामे खोळंबली

30

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.19ऑक्टोबर):-खळेगाव दादेवाडी ते धुमेगाव रस्त्यावरील गुडघ्याईतकले पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याची हाल शेती मशागतीसाठी रस्त्या अभावी अडचणी निर्माण होत असून पूर्ण रब्बी हंगामातील मशागती पडून राहिल्याने शेतकरी चिंताग्रस्त चिंताग्रस्त असून रब्बी हंगामासाठी उशीर झाला तर पिके येऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी खूपच मोठ्या संकटात असून अनेक संकटात सापडेल अडचणी निर्माण होत आहे.

या रस्त्यावर अनेक वस्त्या असून पुढे दोन ते तीन किलोमीटर दूध देखील डोक्यावर घेऊन यावे लागते त्यामुळे शेतकरी व मंजूर करायचे खूप हाल होत आहेत याकडे प्रशासनाची डोळेझाक होत असून मागील दोन वर्षापासून तालुका व जिल्हा स्तरावर यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी निवेदन आंदोलनाद्वारे मागणी केली होती गेल्या वर्षी या दोन किलोमीटर रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी दीड ते दोन लाख रुपये वर्गणी करून शेतात जाण्यासाठी लोकवर्गणीतून लाखो रुपये गोळा करून रस्ता केला होता परंतु या वर्षी चालू हंगामातील अतिवृष्टीमुळे पूर्ण रस्ता वाहून गेला आहे. प्रशासनाच्या वतीने डोळेझाक होत असून तात्काळ रस्ता करण्याची मागणी शेतकर्‍यांतून व दूध व्यवसायदारान कडुन होत आहे