हत्या प्रकरणात १९ वर्षांनी झाला न्याय !

28

🔸राम रहीमला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

🔹कित्येक ढोंगी बाबा अडकलेत बाहुपाशात

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.19ऑक्टोबर):- एक मोठी बातमी समोर आली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना कोर्टानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी राम रहीम दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.बाबा राम रहीम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने राम रहीमला ३१ लाखांचा दंडही ठोठावला आहे,तर उर्वरित आरोपींना ५०-५० हजारांचा दंड भरण्यास सांगितले आहे. डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंह यांची २००२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.निनावी पत्र प्रसारित करण्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्याची हत्या करण्यात आली. डेरा मुख्यालयातील डेरा प्रमुख महिलांचे लैंगिक शोषण कसे करतात, हे या पत्रात सांगण्यात आले होते अज्ञात पत्र प्रसारीत करण्यामागे रणजीत सिंह होता.

असं डेरा प्रमुख राम रहीमला वाटत होते आणि त्याला मारण्याचा कट रचला गेला, असे सीबीआयचे म्हणणे आहे. गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे.दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी २०१७ मध्ये त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात ८ ऑक्टोबर दिवशी दोषी ठरवण्यात आले होते.

पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज त्या निकालाचे वाचन करण्यात आले आहे. त्याअगोदर हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. रणजितसिंह यांची १० जुलै २००२ साली हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ दिवशी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले होते.