CBSE Board : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

29

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (CBSE) दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पहिल्यांदाच बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे मागच्या वेळेप्रमाणे बोर्ड परीक्षा रद्द होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही डेटशीट cbse.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. CBSE ची दहावी, बारावीची पहिली टर्म परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणार आहे.

तर दुसरी टर्म परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या टर्ममधील परीक्षेत विद्यार्थ्यांना फक्त ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येणार आहे.

तर दुसरी टर्म परीक्षा मार्च- एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणार असून या परीक्षेत ऑब्जेक्टिव आणि सब्जेक्टिव असे दोन प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहे.

दरम्यान, दहावीची पहिली टर्म परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर बारावीची पहिली टर्म परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.