परतीच्या पावसाचा दणका सोयाबीन झाकण्यासाठी धावपळ कापूस झाला ओला

33

✒️सिद्धार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.19ऑक्टोबर):-अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाले. आता ऐन दसरा सणाच्या मध्यरात्रीपासून परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन झाकण्यासाठी धावपळ झाली .अतिवृष्टीत नुकसान झाल्याने तर खरिपातील उर्वरित सोयाबीन काढण्याची तयारी सुरु असताना तालुक्यात परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पीक काढणीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी शेतात गंजी लावून असलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे.

तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे शेतात गंजी मारून ठेवलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ झाली अनेकांना रात्रीची उठून शेत गाठावे लागले अनेक शेतकरी पहाटेपर्यंत सोयाबीन झाकण्यासाठी धडपड करताना दिसून आले. शनिवारी सुद्धा रिमझिम पाऊस सुरू होता या पावसामुळे कपाशी सुद्धा ओली झाली आहे .त्यामुळे कपाशीच्या दर्जात फरक पडण्याची भीती सतावत आहे .परिणामी दरही कमी मिळण्याची शक्यता आहे .सध्या ढगाळ वातावरण कायम आहे शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली शनिवारी सकाळी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळला. मुळावा येथे 102.30 मी.मी पाऊस झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार साहेब यांनी मुळावा मंडळातील मुळावा ,वाणेगाव ,हातला ,नांदला, तरोडा ,तिवरंग ,झाडगाव ,पिंपळदरी धनज ,मोहदरी येथे पाहणी केली त्यांच्यासोबत महसूल विभाग व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .पी पी सानप तलाठी मुळावा ,बि जे ढोकळे तलाठी तरोडा, जी एस मोळके तलाठी धनज, गुलोमोदीन शेख तलाठी तिवरंग ,सोमनाथ जाधव कृषी सहायक ,सोबत होते .आधीच अतिवृष्टीतील सानुग्रह अनुदान अद्यापही मिळालेला नाही आता परतीचा पाऊस सुरु झाला,तेव्हा शेतकरी संकटात सापडले आहे. मायबाप सरकारने या गंभीर समस्येची दखल घेऊन आता तरी तातडीने मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत आणि त्यांना मदतीची अपेक्षा आहे.