दिव्यांग तपासणी शिबीर दोन दिवशीय शिबीर उमरखेड येथे संपन्न

✒️अमोल जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.19ऑक्टोबर):-‘यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज, यवतमाळ’ संस्थेच्या ‘दिव्यांग मदत व समुपदेशन विभागाद्वारा लोकनेते माजी आमदार व यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष, पितृतुल्य, श्रद्धेय कै. ॲड. अनंतरावजी देवसरकर साहेब यांच्या (२६ नोव्हेंबर) स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर, जिल्हा प्रशासन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मा. आमदार डॉ. वजाहतजी मिर्झा यांच्या सौजन्याने उमरखेड तालुक्यातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटपासाठीचे पूर्व नाव नोंदणी, मोजमाप व तपासणी, दोन दिवशीय शिबीर उमरखेडच्या गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात रविवार संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन दिव्यांग बंधू, भगिनी आणि मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

शिबिराच्या उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी जि. प. सर्कल मुळावा, पोफाळी, विडूळ व उमरखेड शहरातील दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान “यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थे”चे सचिव मा. डॉ. यादवरावजी राऊत साहेब यांनी भूषविले. या शिबिरामध्ये दिव्यांगांची मोजमाप व तपासणी करण्यासाठी आलेले मा. डॉ. गौरीश सोळंके, पी. एन. ओ. मुंबई, मा. डॉ. सृजन भालेराव, पी. एन. ओ. मुंबई, मा. डॉ. मनिषकुमार, आयडियालॉजिस्ट, कानपूर, मा. डॉ. अरविंद पाल आयडियालॉजिस्ट, कानपूर, मा. डॉ. प्रेमशंकर यादव आयडियालॉजिस्ट, कानपूर, मा. डॉ. गौरव राणा, जयपूर फूट टेक्निशियन, नवी दिल्ली, मा. डॉ. हिरासिंगजी, जयपूर फूट टेक्निशियन, नवी दिल्ली, मा. श्री. गजानन मस्के, समन्वयक, पंकजा कन्सल्टन्सी, परभणी, मा. श्री. नरसिंग भोसले, पंकजा कन्सल्टन्सी, परभणी, तसेच मा. श्री. विश्वांबर वानखेडे, साखरा, मा. श्री. ज्ञानेश्वर आहेर, य. जि. अ. कुणबी समाज दिव्यांग विभाग प्रमुख आणि ह्या अभूतपूर्व शिबिराचे आयोजन कर्ते आमच्या “यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थे”चे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मा. श्री. रामसाहेब देवसरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.ह्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रा.अभय जोशी मराठी विभाग प्रमुख यांनी केले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी काल सोमवार, दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या ब्राह्मणगाव, निंगणूर, दराटी व ढाणकी शहरातील दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, विविध सन्माननीय नेते, आणि मा.रामसाहेबांवर प्रेम करणारी जिव्हाळ्याची आपली माणसं उमरखेड परिसरातील विविध मान्यवर, रोटरी क्लबचे पदाधिकारी, पत्रकार बंधू, सन्माननीय नागरिक यांनी या शिबिरास सदिच्छा भेट देऊन सहकार्य व मार्गदर्शन केले. या अभूतपूर्व शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कौतुक, अभिनंदन करुन आनंद व समाधान व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटल्याप्रमाणे…
“आम्ही नसू अमुच्यासाठी,
जगू मरू समूहासाठी…”
…आणि यातच जीवनाचे सार्थक दडले आहे. असे हे समाजोपयोगी दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित करणाऱ्या मा.श्री.रामसाहेब देवसरकर यांच्याबद्दल कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेचा आधार घेऊन एवढेच म्हणावेसे वाटते की..
“दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.आसे प्रा.अभय जोशी मराठी विभाग प्रमुख यांनी आपले विचार संचालनात व्यक्त केले.

 

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED