आष्टी परीसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

🔹जिल्हा परिषद सदस्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची केली मागणी

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोशी(दि.19ऑक्टोबर):-तालुक्यातील आष्टी परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धान व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने आष्टी – ईलूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदिलवार यांनी शेतकऱ्यांसोबत बांधावर जाऊन पाहणी केली व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधी भरून निघणार नसल्याने शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आष्टी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदीलवार कूनघाडा माल ग्रामपंचायत सरपंच सौ मायाताई कन्नाके ग्रामपंचायत सदस्य पुष्पा कन्नाके .राकेश बहिरेवार. सुरेश येनमवार. दिवाकर दुमनवर. राजू बोलगडवार.व आष्टी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पाहणी दरम्यान वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED