आष्टी कुंनघाडा माल येथील पांदण रस्त्याची दुर्दशा

🔹ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे हाल

🔸सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य यांनीशासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)

चामोर्शी(दि.19ऑक्टोबर):-तालुक्यातील आष्टी शहराजवळ असलेल्या कूनघाडा माल येथील शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्याचे काम करण्यात आले परंतु अजून पर्यंत मुरूम व गिटी न टाकता तसेच मातीकाम करून ठेवण्यात आल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत याची माहिती कूनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ पंदीलवार यांना दिली असता यांनी तात्काळ कुनघाडा माल या गावी जाऊन पांदण रस्त्याची पाहणी केली व कूनघाडा माल येथील शेतकऱ्यांनी पूर्ण पांदण रस्ता दाखवून अडचण लक्षात आणून दिली व शासनाने या पांदण रस्त्याची दुरुस्ती न केल्यास गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले.

असता जिल्हा परिषद सदस्या सौ रूपालीताई पंदिलवार यांनी हा पादन रस्ता पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले यावेळी सौ रूपालीताई पंदिलवार जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ता श्री संजय भाऊ पंदिलवार सौ पुष्पा कनाके ग्रामपंचायत सदस्य सौ मायाताई कनाके ग्रामपंचायत सरपंचा विलास अपनवार व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED