थोर समाज सुधारक, सर सय्यद अहमद खान जयंती प्रित्यर्थ खवातीन- ए -इस्लाम कडून मान्यवर व्यक्तींचा सन्मान

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.19ऑक्टोबर);-दिनांक 17 ऑक्टोंबर ला खवातीन- ए- इस्लाम या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिला संघटने कडून चंद्रपूर येथे आधुनिक भारताच्या नवनिर्मितीत ज्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले,ज्यांनी मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिकतेचा महामार्ग करून दिला,ज्यांनी AMU सारखी अतिशय महत्त्वपूर्ण विश्वविख्यात युनिव्हर्सिटी निर्माण करून दिली असे थोर समाज सुधारक सर सय्यद अहमद खान यांची 205 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मोहतरमा शाहीन शेख यांनी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली,या प्रसंगी उपस्थित वक्त्यांपैकी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. बाबुमियॉऺं शेख, पंचाळा,शहीद टिपू सुलतान फाउंडेशन चे अध्यक्ष श्री.अमजद भाई,ज्येष्ठ पत्रकार श्री.मोहमद रफिक शेख, गडचांदूर व संस्थेच्या अध्यक्षा मोहतरमा शाहीन शेख यांनी सर सय्यद अहमद खान यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकले. तसेच वक्त्यांनी खवातीन- ए -इस्लाम या महिला संघटनेने समाजात केलेले उल्लेखनीय कार्य,सामूहिक लग्न समारंभ,शैक्षणिक कार्यात पुढाकार घेवून पालकांची जनजागृती असो की गरीब होतकरू मुलांना मदत करण्याचे असो की सामाजिक व शैक्षणिक कार्यात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करण्याचं कार्य असो यात या संस्थेने अतिशय प्रशंसनीय कार्य केल्या बद्दल वक्त्यांनी खवातीन – ए – इस्लाम या महिला संघटनेचे मुक्त कंठाने प्रशंसा केली.

या कार्यक्रमात नुकतेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. बाबुमियाॅं शेख, पंचाळा,ज्येष्ठ पत्रकार श्री. मोहोमद रफिक शेख, गडचांदूर,समाजसेवक श्री. अद्दील सिद्दीकी,घुगुस, साधन व्यक्ती श्री. मुसा शेख यांचा स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या महिला सदस्यांनी अतिशय परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालनश्री. मुसा शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. फारुख भाई सिद्दीकी यांनी केले.*

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED