वसमतः’ईद-ए-मिलाद’ निमित्त बार्टीचा अभूतपूर्व ऑनलाइन कार्यक्रम

29

✒️वसमत(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वसमत(दि.20ऑक्टोबर):- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या हिंगोली जिल्हा समतादूत विभागामार्फत ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त झूम मिटींग ॲप द्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन व समाज प्रबोधन कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. डॉ. ऍड. शेख म. रफी म. युसुफ यांनी आपले विचार व्यक्त करताना मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना आपण केवळ एका धर्माच्या नजरेने न पाहता ते जगातील सर्वोत्तम ‘करते समाजसुधारक’ म्हणून पाहिले पाहिजे. असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उमेश सोनवणे. उपायुक्त, जिल्हा जात पडताळणी समिती, हिंगोली तथा विभाग प्रमुख, बार्टी, पुणे. हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून
मा. वैजनाथ भालेराव.नायब तहसीलदार, औंढा नागनाथ, ऍडव्होकेट प्रदीप भालेराव. अध्यक्ष, अन्नपूर्णा अर्बन निधी बँक, परभणी,जवळा बाजार चे उपसरपंच तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष सय्यद फारुख, स्पंदन त्रैमासिकाचे संपादक इंतेखाब फराश पुण्याहून प्रा. दिलीप कसबे साहेब, प्रा. डॉ. विद्या मॅडम हे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जिल्हाभरातून व महाराष्ट्रातल्या बऱ्याच इतर भागातूनही सहभागी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा विषय “ईद-ए- मिलाद – एक प्रेरणादायी दिवस ” व “मोहम्मद पैगंबर यांचे समते विषयक कार्य” हा होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत एडवोकेट रहीम कुरेशी यांनी केले, आभार प्रदर्शन समतादूत सुकेश कांबळे आळणे मिलिंद यांनी केले.या अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन समतादूत प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे व हिंगोली जिल्ह्यातील सर्व समतादूत यांनी केले.