महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या महिला आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी मेहरूनिसा मुलाणी यांची निवङ :- प्रकाश भैय्या गायकवाड

✒️सातारा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सातारा(दि.20ऑक्टोबर):- राज्यातील पोलिसांच्या अडी-अङचणी काम करत असलेल्या महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाउपध्यक्षपदी मेहरूनिसा मुलाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे सातारा जिल्हा प्रमुख मा.प्रकाश भैय्या गायकवाड यांनी मेहरूनिसा मुलाणी यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.

महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटना राज्यातील पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यभर कार्यरत आहे.सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रमुख मा.प्रकाश भैय्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे काम सुरू असून महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या महिला आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी वेणेगाव ता सातारा येथील मेहरूनिसा मुलाणी यांची नियुक्ती करण्यात आली असून मेहरूनिसा मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या वाई तालुका अध्यक्ष म्हणून आरती जगताप यांची निवड केली.

असून आशा जाधव यांची वाई तालुका उपाध्यक्ष म्हणून तसेच लता किरजकर यांची सातारा शहर तसेच मेरी अँथनी ब्रूक्स यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष तसेच हिना सर्फोरोज शेख यांची सातारा तालुका अध्यक्षपदी निवड झाली असून प्रिया जाधव यांची संपर्क प्रमुख म्हणून निवड केली आहे
या निवडीबद्दल या सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राहूल भैय्या दुबाले व प्रकाश भैय्या गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED