धरणगाव शहरात आद्य महाकवी वाल्मीक ऋषी जयंती उत्साहात साजरी

30

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील)

धरणगांव(दि.20ऑक्टोबर):– धरणगाव शहरात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मारकाजवळ रामायणाचे रचियता आद्य महाकवी वाल्मीक ऋषी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी सर यांनी केले. प्रास्ताविकात वाल्मीक ऋषी यांचे जीवन कार्य विस्तृतपणे मांडण्यात आले.

सर्वप्रथम कोळी समाजाचे ज्येष्ठ सदस्य एकनाथ कौतिक कोळी यांच्या शुभहस्ते आद्य महाकवी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक एस.एन.कोळी, गटनेते कैलास माळी यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यानंतर बालकवी चे शिक्षक महेश आहेराव यांनी वाल्मीक ऋषींच्या जीवन संघर्षांवर प्रकाश टाकला.

याप्रसंगी धरणगाव शहरातील बाळासाहेब चौधरी, नंदकिशोर जाधव, संजय तोडे, मुख्या.मोहन चौधरी, दिनेश पाटिल, शिवाजी चौधरी, सुनिल शहा, शिरीष बयस, नाना लांबोळे, प्रकाश वाणी, विलास महाजन, राजेंद्र महाजन, वाल्मिकी समाजातील एकनाथ कोळी, डी.एच.कोळी सर, जी.यु. सोनवणे सर, रघुनाथ कोळी, एस.एन.कोळी सर, सुनील तायडे सर, सुभाष सोनवणे सर, डॉ.धनराज सोनवणे, शाम सपकाळे सर, विजय बाविस्कर सर, महात्मा फुले हायस्कूल चे उपशिक्षक पी. डी.पाटील व बहुजन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन व आभार व्ही.टी.माळी सर यांनी केले