अहिंसा पतसंस्थेकडून सियाचीन येथील जवानांसाठी दिवाळीचे फराळ किट साठी धनादेश देऊन मदत

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.20ऑक्टोबर):- येथील नामांकित असलेल्या अहिंसा नागरी सह.पतसंस्थेकडून रोटरी क्लब ऑफ पुणे, हेरिटेज यांनी राबवलेल्या उपक्रमाला धनादेश द्वारे मदत करण्यात आली.कोरोना सारख्या महामारीने जगाला ऑक्सिजन चे महत्व पटवून दिले आहे. श्वास या अति महत्वाच्या गोष्टीसाठी सुद्धा ज्यांना जीवाची बाजी लावावी लागते आशा उत्तुंग ठिकाणी म्हणजे सियाचीन सारख्या बर्फाळ व उंच प्रदेशात डोळ्यात तेल घालून आपले सैनिक देशाचे संरक्षण करतात.

अशा या जवानांच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ पुणे,हेरिटेज यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे त्याला फुल ना फुलाची पाकळी म्हणून अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी रोटरी क्लब चे मुख्य समन्वयक वैभव पोरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करून मदत केली.यावेळी बोलताना वैभव पोरे यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे हरिटेज च्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष सियाचीन सारख्या दुर्गम भागातील जवानांसाठी दीपावली चे फराळाचे किट प्रति वर्षी आम्ही पाठवत असतो. या वर्षा ५०० फराळ किट पाठवणे प्रस्तावित असून एका किट ची किंमत सर्व साधारणपणे 300 रुपये आहे.यासाठी संस्थेने या उपक्रमात आपला सहभाग नोंदवत जवानांना पाठवण्यात येणाऱ्या फराळाचा 25 किटचा खर्च उचलून एक प्रकारची देशसेवाच बजावली आहे असे प्रतिपादन केले.

सियाचीन सारख्या दुर्मिळ भागात ऑक्सिजन घेणेसुद्धा खूप मुश्कील आहे ही गोष्ट लक्षात येताच पुण्यातील रोटरी क्लब यांच्या माध्यमातून ऑक्सिजनचा एक प्लांट उभा करणे प्रस्तावित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.अहिंसा पतसंस्था व नितिन भाईंसारखे दानशूर लोक देशात असल्यामुळे सतत मदतीचा ओघ येत असतो व जवानांसाठी जी मदत आम्ही पाठवत असतो त्यामध्ये अशा लोकांचा सिंहाचा वाटा असतो असे ते म्हणाले.

अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी हे आपलं मत व्यक्त करताना म्हणाले की देशाचा जवान आपल्या जिवाची पर्वा न करता देश सेवा करत असतो, आज ते तिथे उभे आहेत त्यामुळे आपण घरी सण साजरा करू शकतो त्यामुळे त्यांना देण्यात येणारे दिवाळी फराळाची किट यासाठी केलेली मदत ही अगदीच क्षुल्लक आहे. त्यांच्या कर्तृत्वा पुढे आमची मदत काहीच नाही असे मत त्यांनी व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की वैभव पोरे अशा प्रकारचे आवाहन ज्या ज्या वेळेस करतील त्यावेळी मी व आमची पतसंस्था प्रामुख्याने त्यांच्या मदतीसाठी सतत त्यांच्या सोबत राहील.या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन अजित व्होरा,आदर्श शिक्षक लुनेश विरकर, वैभव पोरे यांचे बंधू संजय पोरे ,संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED