जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी दुष्काळी नेर तलावात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते जलपूजन

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.20ऑक्टोबर):-1995 सली अमलात आणलेली सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव आणि माण तालुक्याची जिव्हाळ्याची जिहे कटापूर उपसा सिंचन योजना आज सव्वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुष्काळी खटाव तालुक्यातील नेर तलावात पाणी आल्याने दुष्काळी भागातील जनता सुखावली शेतकरी वर्ग सुखावला तर पाण्याचे जलपूजन शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी करून राजकीय विरोधकांच्या तोंडचे पाणी नक्कीच पळवून घसा कोरडा केले चित्र पहावयास मिळत आहे.

यावेळी आमदार महेश शिंदे यांचे समर्थक ,शेतकरी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेर तलावामध्ये पाणी आल्याने कायम दुष्काळी खटाव तालुका माण तालुक्यात भाग्य उजळले महेश शिंदे यांनी केलेल्या जल पूजनाच्या कार्यक्रमाने सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत जिहे-कठापूर च्या पाण्याच्या निमित्ताने राजकीय कारंजे आणि फवारे भविष्यकाळात नक्कीच पाहायला येणार यात शंका नाही

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED