पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाइन पध्दतीने आयोजन

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.20ऑक्टोबर):-जिल्हा कौशल विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली यांचे मार्फत दिनांक 21 ऑक्टोंबर 2021 ते दि. 25 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे online पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये INNOVESOURCE SERVICES PVT LTD. या कंपनी द्वारे BRANCH RELATION EXECUTIVE करिता 40 पदे भरण्यात येणार आहे .सदर पदांकरिता शैक्षणिक अहर्ता किमान 12 वी ते कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून अनुभवी तसेच अनुभव नसलेल्या दोन्ही उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे .सदर पदे गडचिरोली ,गोंदिया ,भंडारा तसेच अमरावती विभागातील जिल्ह्यांकरिता भरण्यात येणार असून या पदांचे अंदाजित वेतन 12 ते 15 हजार व इतर सुविधा राहणार आहे .

तसेच PIAGGIO VEHICLES PVT LTD. पुणे या कंपनीमधे ७० पेक्षा जास्त पदांकरिता SSC/HSC/ITI उत्तीर्ण Fitter, Painter, Diesel Mechanic Welder,Turner, Wireman, Sheet metal, MCVC Auto ट्रेड च्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे .या पदांकरिता अंदाजित वेतन 12000 व इतर सुविधा राहणार आहे . सदर पदांकरिता 19 ते 27 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात .

तरी गडचिरोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याकरिता www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टल वर अर्ज करावा किंवा या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 07132-222368 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येऊन नोंदणी करावी तसेच या कार्यालयाचे E-mail id- gadchirolirojgar@gmail.com वर आपले आवेदन पाठवावेत असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली श्रीमती नीता औघड यांनी केले.