बीड येथे होणार्‍या ओबीसी आरक्षण कृतज्ञता मेळाव्यास ओबीसी समाज बांधवांनी उपस्थित रहा – बापू गाडेकर

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधि)

तलवाडा(दि.20ऑक्टोबर):-महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणास संरक्षण देणारा अध्यादेश काढून ओबीसी समाजाला एकप्रकारे दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल शनिवार दि.२३ आँक्टोबर २०२१ रोजी दुपारी ठिक एक वाजता यशवंतराव चव्हाण नाटगृह बीड या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री – छगनरावजी भुजबळ आणि महाविकास आघाडी सरकारचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री – धनंजय मुंढे तर उदघाटक म्हणून मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी – माजी आमदार तसेच इतर मान्यवर नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कृतज्ञता मेळाव्यास गेवराई तालुक्यातील सर्व जाती – धर्मातील ओबीसी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणास संरक्षण देणारा अध्यादेश काढून ओबीसी समाजाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महात्मा फुले समता परिषद बीड यांच्या वतीने अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष – अँड.सुभाष भाऊ राऊत यांनी या कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी राजकीय गट – तट बाजूला ठेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बापू गाडेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED