२०२१ कवींच्या २०२१ कवितांचा पहिला महाकाव्यग्रंथ “महामानव” गोंडवाना विद्यापीठात प्रकाशित

33

🔹महाकाव्य ग्रंथ निर्मितीचे कार्य अतुलनीय – डाॕ. अनिल चिताडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.20ऑक्टोबर):-महाराष्ट्रातील २०२१ कवींच्या २०२१ कविता असलेला जगातील पहिला महाकाव्य ग्रंथ “महामानव” डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठात कुलसचिव डाॕ. अनिल चिताडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीबोली चे कवी संजिव बोरकर ,कवी मारोती आरेवार उपस्थित होते.

नांदेडच्या प्रा. अशोक कुमार दवने यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील कवींशी संपर्क साधून महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता संकलित केल्या गेल्या. प्रा. दवणे यांच्या प्रमुख संपादनात प्रस्तुत महाकाव्य ग्रंथ साकारल्या गेला. आणि आज या ग्रंथाचे एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित केला गेला. त्यानुसार ह्या महाग्रंथाचे प्रकाशन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले. याप्रसंगी कुलसचिव डाॕ. चिताडे म्हणाले की, महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील २०२१ कवीतांचे संकलन आणि संपादन हे साहित्य क्षेत्रासाठी केले गेलेले अतुलनिय असे कार्य आहे.

प्रास्तविकपर मनोगतात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी प्रा. दवणे यांनी घेतलेल्या परिश्रमाचे आणि दिलेल्या साहित्यसेवेचे कौतुक केले. सूत्रसंचालन कवी मारोती आरेवार यांनी केले तर आभार संजिव बोरकर यांनी मानले. या महाग्रंथात विशेषतः गडचिरोली जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी विनायक धानोरकर ,मारोती आरेवार,संजिव बोरकर ,केशव बारसागडे ,अशोक मांदाडे ,दुर्योधन तरारे,विकास भैसारे ,वामनदादा गेडाम ,अनिल अवसारे ,श्रीनिवास गेडाममालती सेमले ,प्रदीप कुमार साखरे , डाॕ.
चंद्रकांत लेनगुरे ,बंडोपंत बोढेकर , अमर कुमार खंडारे , सुजाता दरेकरपुरुषोत्तम ठाकरे ,कृष्णकुमार निकोडे , संगीता रामटेके
अँड.कविता मोहरकर ,माणिकचंद रामटेकेसंगीता ठलाल ,भारत मेश्राम देवराज खंडारे ,श्रीकृष्णा कटकेलवार इत्यादी कवीमंडळीच्या रचना समाविष्ट आहे.