






✒️प्रतिनिधी प्रतिनिधी(संजय कोळी)
दोंडाईचा(दि.21ऑक्टोबर):-शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावाकरिता पाणी पुरवठा योजनासाठी ३५ लाख रुपये चा निधि मंजुर करण्यात आला आहे.तसेच झोतवाडे येथील सरपंच सौ शोभा सुनील ठाकरे झोटवाडे याच्या विशेष पाठपुरावा ने झोटवाडे गावासाठी पाणी पुरवठा योजना ने साठी आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतूत्व ने 35 लाख रुपये ची पाणीपुरवठा योजना निधी मंजूर करण्यात आली.
त्या साठी ग्राम पंचायत सदस्य सुनील ठाकरे यांनी विशेष लक्ष्य देऊन आमदार रावल याच्या कडे सतत मागणी करत असत. आमदार रावल यांनी झोतवाडे गावाची लोकसंख्या लक्ष्यात घेता सरपंच यांच्या शब्दाला मान देऊन 35 लाख रुपये निधीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून दिली. त्या साठी आमदार रावल याचे झोतवाडे ग्रामपंचायत तर्फे विशेष आभार मानले व सरपंच सौ शोभा सुनील ठाकरे यांचे झोतवाडे ग्रामस्थांकडून खूप कौतुक करण्यात आले.





