उस बिलासाठी कॉंग्रेस भवन सोलापूर समोर आंदोलन करणाऱ्या 18 पैकी 8 शेतकऱ्यांचे दिले बिल

🔸उर्वरित शेतकऱ्यांचे उस बिल लवकरच देण्याचे दिले आश्वासन – प्रकाश वाले

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

सोलापूर(दि.21ऑक्टोबर):- अणदूर येथील काही शेतकऱ्यांनी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. पण काही कारणामुळे त्यांना उसाचे बिल मिळाले नव्हते. म्हणून उसबिल मिळावे यासाठी अणदूर येथील 18 शेतकऱ्यांनी उसबिलासाठी कॉंग्रेस भवन सोलापूर समोर आमरण उपोषण सुरू केले होते आज रोजी सोलापूर शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मध्यस्थी करून कारखान्याचे चेअरमन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आज रोजी ताबडतोब 8 शेतकऱ्यांचे चार लाख साठ हजार रुपये देण्यात आले उर्वरित उर्वरित शेतकऱ्यांचे उस बिल लवकरच देण्याचे आश्वासन कारखान्याचे प्रमुखांनी दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी आणि शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी कारखान्याचे संस्थापक माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे व चेअरमन संचालकांचे आभार व्यक्त केले.यावेळी शेतकरी नवनाथ घुगे, कृष्णात घोडके, काशीनाथ घुगे, दशरथ घुगे, धनराज घुगे, शिवानंद लंगडे, सुधाकर कुंभार तसेच युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, अशोक कलशेट्टी, NK क्षीरसागर, पंडित सातपुते, नूर अहमद नालवार, मुशताक लालकोट, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED