मा.खासदार व मा. आमदार यांची न.प. विषयी आघाडी!

29

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.21ऑक्टोबर):-चर्चेत असलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी खामगाव नगरपालिका भाजपच्या ताब्यात असतांना जिल्हाध्यक्ष व आमदार असलेले आकाशदादा फुंडकर यांचे होमपिच ग्राऊंड धिरेधिरे सैल होत असल्याचे शहरवासियांना दिसत असतांना शिवसेना संपर्कप्रमुख व बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व काँग्रेसचे नेते मा.आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी स्थानिक विश्रामग्रूह येथे दसरा निमीत्य सदिच्छा भेट बैठक घेतली यावेळी नगरपालिका व ईतर संस्था याविषयी चर्चा झाली महाविकास आघाडी यावेळी सर्वे जागेवर आपले ऊमेदवार ऊभेकरुन त्यांना निवडून आणेल. यासह विविध विषयावर चर्चा झाली.

मागिल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक जागा त्याकाळिचा मित्र पक्ष असलेल्याकरिता युती म्हणुन सोडली होती व ईतर प्रभागात शिवसेना जेमतेम दहा बारा जागेवर स्वतंत्र लढली! असो याची पुनराव्रुत्ती महाविकास आधाडी व भाजप हे युती करुन कि एकसंघ लढणार हे येणारा काळच ठरवेल.

याबैठकीला घाटाखालील शिवसेना जिल्हाप्रमुख मापारी,ऊपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, तालुकाप्रमुख सुरेश वावगे काँग्रेसचे नगरसेवक किशोर भोसले,एपीएमसीचे माजी प्रशासक पजाबराव देशमुख, एन एसयुआयचे रोहित राजपुत हे यावेळी ऊपस्थित होते.यापुर्वी खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेची बैठक घेत या बैठकिला त्यांनी शहरप्रमुख पदाविषयी चर्चा केली असता आलेली नावे पाहत काही पदाधिकारींना आपल्या पक्षाची ताकद वाढवायचे यासह विविध बाबी मांडत खडसावत संघटन वाढवायचे असतांना तुम्ही काहिच करत नसल्याने नावापुरती पदे हे जमणार नाही. असे सुनावले असल्याची चर्चा आहे.