उमापूर जवळील गुटख्याच्या गोदामावर छापा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच आरोपींना अटक

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21ऑक्टोबर):-चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल बारा लाख रुपयांचा गुटखा आणि पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो पोलीस प्रशासनाच्या विशेष पथकाने एकूण 17 लाख रुपये मुद्देमाल सह पाच आरोपींना अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की बीड पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने उमापूर गावा जवळील मारुतीची वाडी शिवारात सोपान विठ्ठलराव भोसले यांच्या शेतात असलेल्या घराजवळील गोडाऊन मध्ये आयशर कंपनी चा टेम्पो आणि त्यात आणलेला गुटका उतरून घेण्यासाठी काही माणसे तिथे आली आहे. अशी गुप्त बातमी द्वारे मार्फत पोलिसांना याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

असताआयशर टेम्पो मधून गुटख्याच्या बॅग उतरवत असताना पाच लोकांना अटक करण्यात आले आहे.विठ्ठल विष्णू काठोळे (वय 34) हा त्या टेम्पो चालक असून राहणार नामलगाव फाटा,सुदाम बाबासाहेब पाटोळे (वय 31) राहणार नामलगाव,रामेश्वर विष्णू कातखडे (वय 38) राहणार उमापुर तालुका गेवराई,नवनाथ अशोक राऊत (वय 25) राहणार उमापूर,अजित अशोक पाटणे (वय 40) राहणार उमापूर, ही व्यक्ती गुटख्याचा मालक असे सांगण्यात आले असून वेगवेगळ्या कंपनीचा गुटका पकडण्यात आला आहे.सदरील आरोपींविरुद्ध कलम 328 272 273 346 कलम 130 3/177 प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली असून चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED