भीती वाटते…!

40

भीती वाटते

हो! भीतीच वाटते…

धर्म माझा सांगण्याची…

अचानकच एकटे पडण्याची…

श्रेष्ठ, कनिष्ठ…

याचा वादच नाही

वेगळा का मी…..?

अलगच दिसेल न सगळ्यात…

धाकधुक काळजात..

ठोका चुकण्याची..

हो! भीती वाटते…

नष्ट कोण होत आहे…?

नष्ट कोण होत आहे….?

मी की तो…?

तो, जो शेजारीच आहे माझा….

तो…..!

ध्रुवीकरण चुंबकाचे वाचले होते विज्ञानात

इयत्ता आठवीला…

चुंबक दक्षिणेचा दक्षिणेला एकवेळ भेटेल याच विज्ञानात

खरे-खोटे सिद्ध होईल आज न उद्या…

नव-नवीन संशोधनात…

धुव्र आमचे पार दूर सरकले….

मेंदू जागचा हालला ….

यंत्रच मिळेना…

बस! म्हणून सांगायला त्याला म्यानात…

वेडे होऊ का…?

एकेदिवशी याच धर्मापायी…

भीती वाटते…!

माझी ओळख सम्पण्याची

हो! भीती वाटते…

धर्म बुडवाल नाहीतर सोडून द्याल..

धर्म बुडवाल नाहीतर सोडून द्याल..

एकमेकांना आपसात भांडण्यापायी…

माणूस, माणूसच आहे का?

जो आदी होता मानव…

आधी तो असाच होता की…

वेगळा काही….

शंकाच येते….

रक्त त्याचे पातळ घट्ट होईल

एखादं नव्या रोगाने…

तांबडे ते हिरवे,निळे, भगवे

होत असेल तर…

भीती वाटते हो..

काळे होऊन विष ते होण्याची…

हो! भीती वाटते…

जरुरी नाही…

जरुरी नाहीच..

धर्माला, जातीला गरज नवी करण्याची…

मरणापासून एक श्वास दूर आहोत आपण..

इतका भेद कशापायी

सारख्याच वर्णाच्या माणसात…

पशु तरी बरे थोडे…

जे रडतात निदान…

आपले आपल्यात नसण्याच्या दुःखाने

भावना त्यांनी कमावली

अबोल असून बिचारे

याचाच तो पुरावा…

एका संशयापायी…

धर्म वाचवण्यासाठी

आमचा-तुमचा…

जो तुमच्याच भाषेत सम्पत आला..

काटेरी पातेही तलवारीचे तेव्हा

नाजूक भासेल गळ्यावर ठेवले तरी…

भावना हरवल्या नाहीत

मेल्याच…

याचाच असेल तो पुरावा…

भीती तर वाटत होतीच आजवर…

मनातलं सांगू तुम्हाला…

मला लाज वाटते….

हो! मला लाज वाटते

माणूस म्हणून घेण्याची…

✒️कवी:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो-8806721206)