जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती झालेल्या शिक्षक बांधवांचा सत्कार संपन्न

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई,विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.21ऑक्टोबर):-आज दिनांक २०/१०/२०२१
कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ माजलगांव कार्यकारीणीच्या वतीने बुध्दविहार श्रावस्तीनगर केसापूरी वसाहत माजलगांव यथे बीड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षकातून उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नोती मिळालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष भालेराव एस एच (महासचीव कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ बीड जिल्हा)होते तर प्रमुख पाहूणे मा . रमेश फपाळ सर(शिक्षक नेते)मा. एकनाथ बेदरे (मख्याध्यापक महासंघ ता अध्यक्ष माजलगांव) तसेच अँड.दशरथराव मकसरे ,मा भगवानराव पौळ(बीड जिल्हा नेते कास्ट्राईब महासंघ), अबुबकर सिध्दिकी सर लिंबाजी सोनपसारे,बबनराव खोपे (माजी सरपंच गुंजथडी),माणिक राठोड. राज खुडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमात जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.मंगलताई पोटभरे/समुद्रे,मा .ताहेर पठाण सर तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदी निवड झालेले आयु.शोभाताई पाईकराव/मकसरे ,शेंडगे परमेश्वर सर, शेख डीआर,वंजारे एम डी,यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्तावीक महासंघाचे ता अध्यक्ष दयानंद खोपे यानी केले तर तालुका सचिव संजय मकसरे यांनी महासंघाच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त केले .सत्कार मुर्तींनी आपली मनोगते व्यक्त केली बहारदार सुत्रसंचलन आयु. घनघाव जी एन यांनी केले तर आयु.दिपक भालेराव. यांनी महासंघाच्या वतीने आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्सासाठी आयु कपील डोंगरे ,गंगारामजी सोनवने,रमेश कांबळे गौतमराव पौळ,गायकवाड बि एन, यांनी परिश्रम घेतले यावेळी आयु.चंन्द्रकलाताई समुद्रे, गणेश झाटे,बाजीराव शिंदे,शहापुरकर,बाबासाहेब डावरे,उमाकांत आंधळे, मोहन मते,बळीराम गणगे, व सर्व कास्ट्राईब महासंघाच्या पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घतले तर कार्यक्रमास विविध संघटनेचे पदाधिकारी आणि बहूसंख्य शिक्षक हजर होते.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED