कवयित्री सौ. प्रिती जगझाप रत्नप्रभा काव्यलेखन पुरस्काराने सन्मानित

24

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21ऑक्टोबर):-झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कवयित्री प्रा.रत्नमाला भोयर नगराध्यक्ष यांच्या शब्दरिंगण या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशनाप्रसंगी मूल येथे रत्नप्रभा काव्यलेखन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात या पुरस्काराने बल्लारपूर निवासी सौ. प्रिती विलास जगझाप यांना सन्मानित करण्यात आले.मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.सुदर्शन दिवसे होते.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी अरूण झगडकर , गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी , समाजसेवक प्रभाकर भोयर, सौ. मंजुळाबाई कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.सौ. प्रिती विलास जगझाप यांचा नुकताच नंदादिप हा काव्यसंग्रह चामोर्शी येथे प्रकाशित झाला.

त्या अध्यापन कार्यात अग्रेसर असून उपक्रमशील शिक्षिका असून विद्यार्थीं वर्गात प्रिय आहे.सत्कारमूर्तीचा परिचय आणि कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभार कवयित्री संजिवनी वाघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळ मूल शाखेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.