ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व आक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करा- सीईओना दिले निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21ऑक्टोबर):-चंद्रपुर जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील काही महिन्यांपासून विलंबाने होत आहे काही दिवसानंतर दिवाळीचा सण असल्याने ग्रामसेवकाच्या कुटुंबाला दिवाळी सण साजरा करण्यासाठी वेतन वेळेवर मिळण्याची नित्तांत गरज आहे त्यामुळे ग्रामसेवक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर व आक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा चंद्रपुरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे निवेदनातून केल्याची माहिती जिल्ह्याचे प्रचार प्रसिद्धी प्रमुख केशव गजभे यांनी दिली दिवाळीपूर्वी वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आल्याची माहिती प्रचार प्रसिद्धी प्रमुख केशव गजभे यांनी दिली.

यावेळी*मा.श्री.प्रकाश खरवडे* जिल्हाध्यक्ष, *मा.श्री.पुंडलिक ठाकरे* सरचिटणीस, *मा.श्री.विजय यारेवर* कार्याध्यक्ष, *मा.श्री.विनोद झिले* उपाध्यक्ष, *मा.कु. सुशिला उईके* महिला उपाध्यक्ष, *मा.कु.विद्या गिलबिले* महिला संघटक, *मा.कु.वनिता कोडापे* राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 जिल्हा शाखा चंद्रपुर उपस्थित होते.

महाराष्ट्र, मागणी, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED