मुख्याध्यापक व स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना तांदुळ घरपोहोच केला वाटप

28

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.21ऑक्टोबर):-धरणगाव आज दि.२० आक्टोबर, २०२१ रोजी जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष मा. श्री.बापुसाॊ.इंजि.आर.डी. पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने के.जी.गुजराथी मुकबधीर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय व मुकबधीर निवासी कार्यशाळा धरणगाव येथे कोविड १९ च्या प्रादुर्भाव असल्याकारणाने शासन निर्णया नूसार शाळा बंद असल्याने विद्यार्थींच्या घरी जाऊन त्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व तांदूळ वाटप करण्यात आले. तसेच भगवान महाराज मठ मधिल विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील बालकांना फळं व बिस्किट वाटप करण्यात आले.

तसेच सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला ह्या प्रसंगी संस्थाध्यक्ष मा. श्री. बापुसाॊ. इंजि.आर.डी.पाटील साहेब हे व विद्यार्थींनी ऑनलाइन उपस्थित होते.

ह्या प्रसंगी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.वाल्मीक पाटील सर, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. ऋषिकेश जाधव सर व विशेष शिक्षक मा. श्री. आर. एच. पाटील सर, मा. श्री. नंदकुमार पाटील सर, मा. श्री. दिपक जाधव सर, मा.श्री.संतोष भडांगे सर, मा. श्री. किशोर पाटील सर, चंद्रराव सैंदाने सर, मा. श्री. राकेश पाटील सर, लिपिक मा.श्री.अनंत जाधव तसेच कर्मचारी मा.श्री.दिलीप पाटील, मा.श्री.उमेश पाटील, मा.सौ.कल्पनाताई ठाकरे, आरिफ शहा , मा.श्री.राकेश पाटील, अमोल पाटील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.