लासलगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगार टोळीला पोलिसांनी केले बंदिस्त

36

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.21ऑक्टोबर):-तालुक्यातील लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगार टोळीला लासलगाव पोलिसांनी गजाआड केले आहे त्यांच्याकडून इंडिका कार सह 1 लाख 39 हजार चा मुद्देमाल जप्त केला आहे मंगळवारी कोजागिरी पौर्णिमा व इथे सणाच्या निमित्ताने पोलीस शहरात पेट्रोलियम करत असताना ही मोठी कारवाई केली आहे टाकळी विंचुर गावचे हद्दीतून जाणाऱ्या विंचूर राज्यमार्गावर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ नाकाबंदी सुरू असताना रोडणे येणारी-जाणारी वाहनाची तपासणी करताना हे दरोडेखोर सापडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की चांदवड कडून लासलगाव कडे येणारी कार नाकाबंदी पासून काही अंतरावर थांबवून त्यांच्या ताब्यातील वाहन वळवून पुन्हा चांदवड बाजूच्या दिशेने पळून जात असल्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना संशय आला त्यानंतर नाकाबंदी ठिकाणी असलेले अधिकारी अंमलदार यांनी कारला पळत जाऊन थांबवले यातील सहा प्रवासी वाहनाचे दरवाजे उघडून पळण्याचा प्रयत्न केला होता यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यांचे गाव नाव सांगण्यास टाळाटाळ केली वाहनाची झडती घेतल्यानंतर टाटा कंपनीची इंडिका कार एम एच बारा एम बी 40 71 या वाहनांमध्ये दरोडा टाकण्याचे साहित्य साधने मिळून आली या प्रकरणात लासलगाव पोलीस स्टेशन ला साबिर कुरेशी सर्फराज बाबा शेख कुर्बानी इस्माईल शेख शनिराज विलास ढोकणे सागर उर्फ संदीप सुरेश कांबळे योगराज मोहन सोनवणे या साजना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्वांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे या अगोदर श्रीरामपूर येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देविदास लाड हे करीत आहे