जामनाईक येथील ठोके कुटुंबाना भिमटायगर सेनेनी दिला मदतीचा हात

32

✒️पुसद प्रतिनिधी(बाळासाहेब ढोले)

पुसद(दि.21ऑक्टोबर):-तालुक्यातील जामनाईक १ येथील मधुकर ठोके हे किराणा दुकान चालवून कुंटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते अशातच गावातील काही समाजकंटकांनी त्यांचे किराणा दुकान जाळून टाकले .यामध्ये त्यांचे संपूर्ण दुकान जळून राखरांगोळी झाली.

भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी त्यांना धीर देऊन मदतीचा हात दिला.

आर्थिक मदत केली व त्यांचे किराणा दुकान परत उभे राहण्यास मदत केली. या किराणा दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी पुसद पं.समितीचे गटविकास अधिकारी प्रविणकुमार वानखडे, भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे,सामाजिक कार्यकर्ते बाबाराव उबाळे उपस्थित होते.भिम टायगर सेनेच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्वत्र भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष यांचे कौतुक होत आहे.

यावेळी मधुकर उत्तम ठोके,सुभाष दत्तराव आठवले,भगवान आठवले, सिद्धार्थ मारुती इंगोले,अमोल धर्मा कांबळे दत्तराव आठवले, विजय आठवले ,दतराव दिपके, पंजाब आठवले, धीरज इंगोले,दत्तराव आठवले,संदीप आठवले, अजय आठवले, रतनबाई आठवले, पुंजाबाई ठोके, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते