“भगवान बुध्दाच्या तत्वाचा सुगंध सगळीकडे वास करतो.. तेच बुध्दाचे धम्मनगर होय”- कुसुमताई भवरे

31

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.21ऑक्टोबर):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा यवतमाळ चे वतीने प्रवचन मालिकेतील १८ वे सत्रातील प्रवचन मालिका कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते.

सर्वप्रथम महीला शाखा रविराजनगर तर्फ तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन जिल्हा शाखेचे वतीने पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवि भगत जिल्हाध्यक्ष यवतमाळ होते प्रमुख अतिथी म्हणुन राहुल राऊत जिल्ह्याचे कोषाध्यक्ष, चारही विभागाचे उपाध्यक्ष ,प्रमुख मार्गदर्शक कुसुमताई भवरे, केंद्रिय शिक्षिका यवतमाळ, प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच सिध्दार्थ गायकवाड,अध्यक्ष दारव्हा, आद.नागोराव बन्सोड अध्यक्ष आर्णि ,विनायक देवतळे अध्यक्ष दिग्रस,अंबादास नागदेवते शहर अध्यक्ष यवतमाळ हे उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रा.खुशाल ढवळे यांनी केले, गौतम कुंभारे यांनी पाहुण्याचा परीचय करुन दिला.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून आद.कुसुमताई भवरे यांनी *”तथागत भगवान बुध्दाचे धम्मनगर “* या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या कर्मरुपी पैसा घेवुन बुध्दाचे धम्म नगरातील फुले,फळे म्हणजे पवित्र तत्व विकत घ्यावे, आत्मसात करावे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रुपेश वानखडे,जिल्हा सरचिटणिस यांनी केले.उषाताई खंडारे, यांनी आभार मानले. या ऑनलाईन प्रवचन मालिका कार्यक्रमाची तांत्रीक जबाबदारी मोहन भवरे तालुका अध्यक्ष यवतमाळ यांनी सांभाळली.

या कार्यक्रमास धम्मबांधव ,केंद्रीय शिक्षिका,केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य ,तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते .

या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले.